Chandrakant Khaire Saam Tv
लोकसभा २०२४

Chandrakant Khaire: निवडणुकीत पराभव, अंबादास दानवे आणि ८० कोटी; चंद्रकांत खैरे यांनी केला मोठा गोप्यस्फोट

Chandrakant Khaire Defeat In Lok Sabha Election 2024: छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीत मविआच्या चंद्रकांत खैरेंचा झाला आहे. त्यानंतर खैरेंनी अंबादास दानवेंच्या कामावर टीका केली आहे.

Rohini Gudaghe

माधव सावरगावे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा दारूण पराभव झाला आहे, तर संदिपान भुमरे यांचा दणक्यात विजय मिळवला आहे. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत खैरे यांनी हा पराभव मनाला लागणारा असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांनी निवडणुकीत पराभव का झाला? याचा देखील गौप्यस्फोट केला आहे. चंद्रकांत खैरे नेमकं काय म्हणाले, ते जाणून घेऊ या.

मनाला लागणारा पराभव आहे. मी कधीही भ्रष्टांचार केला नाही. निर्व्यसनी माणसाला नागरिकांनी मत दिली नसल्याने दु;खी झाल्याचं चंद्रकांत खैरेंनी म्हटलंय. तसंच त्यांनी पराभवाचं खापर त्यांनी अंबादास दानवेंवर (Ambadas Danve) फोडल्याचं दिसत आहे. या निवडणूकीत संदीपान भूमरे यांनी ८० कोटी रूपये वाटल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे. तसेच निवडणूकीत अंबादास दानवेंनी काम केलं नसल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.

हा पैशाचा, धनशक्तीचा विजय आहे. पराभवानंतर चंद्रकांत खैरे यांनी आंबादास दानवेंवर टीका केली आहे. मला पक्षातील काहींनी काम केलं नाही, असा संशय आहे. पक्ष प्रमुखाकडे तक्रार करणार असल्याचं खैरेंनी म्हटले आहे. तर पुढे विधानसभेत धोका होऊ नये, यासाठी मी पक्ष प्रमुखांना भेटणार तक्रार करणार आहे. मी एकटा पडलो, ते फक्त यायचे बसायचे. यावेळेस तरी अंबादास दानवे यांनी काम करायला पाहिजे होते. त्यांनी जबाबदारी पार पाडायला पाहिजे होती, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं (Lok Sabha Election 2024) आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) शिंदे गटाचे संदिपान भुमरे यांना ४,७६,१३० मतं मिळाली आहेत. तर चंद्रकांत खैरेंना २,९३,४५० मतं मिळाली आहेत. या निवडणुकीत भूमरेंनी ८० कोटी वाटल्याचा गौप्यस्फोच देखील चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे. मी पक्ष सोडणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. तर ईव्हीएममध्ये काही तरी झाले असेल, असा संशय देखील खैरेंनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा

PM Kisan Yojana: तारीख ठरली! ४८ तासात शेतकऱ्यांच्या खात्यात खटाखट २००० येणार, अधिकृत तारीख आली समोर

मोठी बातमी! घरात चारचाकी असेल तर मोठा झटका, रेशन कार्ड कायमचे बंद होणार, वाचा नवे नियम काय आहेत?

Jalgaon : विम्याच्या ५० लाखांसाठी कट रचला, पण गेम फसला; डॉक्टर अन् ४ पोलिसांना बेड्या, नेमकं प्रकरण काय?

Kids Height Growth : लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी करा 'हे' सोपे व्यायाम

SCROLL FOR NEXT