Maharashtra Election 2024: मतदानाची टक्केवारी कमी का झाली? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली गंभीर दखल; तात्काळ चौकशीचे आदेश
Mumbai Voting Percentage: CM Eknath Shinde Ordered An Inquiry on the Low Voting Percentage In Mumbai Saam Digital
लोकसभा २०२४

Mumbai Voting Percentage: मतदानाची टक्केवारी कमी का झाली? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली गंभीर दखल; तात्काळ चौकशीचे आदेश

Gangappa Pujari

मुंबई, ता. २१ मे २०२४

लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यात मतदान पार पडले. मुंबई, ठाणे, कल्याणसह राज्यातील १३ लोकसभा मतदार संघांमध्ये मतदान झाले. या मतदानादरम्यान मुंबईमध्ये अनेक ठिकाणी यंत्रणांनी संथगतीने मतदान केल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला होता, तसेच अनेक नागरिकांनी तक्रारीही दिल्या होत्या. या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यातील पाचव्या टप्यात मतादानाची टक्केवारी घटली, त्यामागे मतदान प्रक्रियेतील संथपणा कारणीभूत होता क? याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदान प्रक्रियेदरम्यान आलेल्या अनेक तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे.

मतदानावेळी वृद्ध मतदारांना रांगेचा आणि कडक उन्हाचा मतदारांना झालेला त्रास त्यामुळे मतदानावर झालेला परीणाम यांची सविस्तर चौकशीचे करण्याचे मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना आदेश दिलेत. पाचव्या टप्यातील मतदान प्रक्रियेची प्रशासनाने पुरेसी काळजी घेतली नव्हती का? मतदान टक्केवारी कमी का झाली? प्रशासन कुठे कमी पडले? याची तात्काळ चौकशी करण्यासंदर्भातील सूचना मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्या आहेत.

दरम्यान, मुंबईतील कमी मतदानावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगासह, भाजप, शिंदे गटावर गंभीर आरोप केले होते. महाविकास आघाडीला जास्त मतदान होईल अशा भागात मुद्दाम कासवगतीने यंत्रणांनी काम केल्याची शंका संजय राऊत यांनी व्यक्त केली होती. त्याचबरोबर यावरुन उद्धव ठाकरेंनीही संताप व्यक्त केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bajaj CNG Bike: जगातील पहिली CNG बाईक Freedom आज होणार लॉन्च, जबरदास्त फीचर्ससह किती आहे किंमत?

Solapur Breaking : शेतकऱ्यावर कोसळलं आभाळ, महावितरणच्या विद्युत तारेने केला घात; ओढ्यात विजेचा धक्का लागून 24 म्हशींचा मृत्यू

Aadhaar Card: आता आधार कार्ड बनवायला लागू शकतात 6 महिने, UIDAIने केले 3 मोठे बदल

Shukra Rashi Parivartan : ४ दिवसांत ३ राशींचे नशीब उजळणार; यशाचा मार्ग गवसणार, वाचा

Pune Tourist Places: पुण्यात पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश लागू! कुठल्या ठिकाणी जमावबंदी आणि काय आहेत नियम? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT