Sunita Kejriwal On BJP Saam Tv
लोकसभा २०२४

Arvind Kejriwal: भाजपला अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात संपवायचंय, सुनीता केजरीवाल यांचा गंभीर आरोप

Sunita Kejriwal On BJP: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगात आहेत. यातच त्याची शुगर लेव्हल वाढल्याचा मुद्दा गाजत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Sunita Kejriwal On BJP:

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगात आहेत. यातच त्याची शुगर लेव्हल वाढल्याचा मुद्दा गाजत आहे. केजरीवाल यांना इन्सुलिनची गरज आहे, मात्र असे असतानाही त्यांना तुरुंगात इन्सुलिन दिले जात नाही, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. त्याच्या हत्येचा कट रचला जात आहे. सुनीता केजरीवाल यांनीही रांची येथील इंडिया आघाडीच्या सभेत हा मुद्दा उपस्थित केला. त्या म्हणाल्या, भाजप सरकारला माझे पती अरविंद केजरीवाल यांना संपवायचंय आहे. तुरुंगात त्याला इन्सुलिन दिली जात नाही.

त्या म्हणल्या की, इंडिया आघाडी भाजपच्या भाजपच्या हुकूमशाही विरोधात लढणार आणि जिंकणार. सुनीता केजरीवाल म्हणाल्या, त्यांना माझे पती अरविंद केजरीवाल यांना संपवायचंय. त्यांच्या जेवणावर कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जात आहे. त्यांना इन्सुलिन दिली जात नाही.

त्या म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल यांना सत्तेची लालसा नाही. त्यांना फक्त देशाची सेवा करायची आहे. राजकारण ही अत्यंत घाणेरडी गोष्ट आहे. त्याच्या जेवणावर कॅमेराद्वारे लक्ष ठेवलं जात आहे. ते काय खातात यावर लक्ष ठेवले जात आहे. ते मधुमेहाचे रुग्ण असून गेल्या 12 वर्षांपासून दररोज इन्सुलिन घेत आहेत. मात्र तुरुंगात त्यांना इन्सुलिन दिले जात नाही. त्यांना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना संपवायचंय आहे. ते अरविंद केजरीवाल यांचे विचार समजू शकत नाहीत.

आज सभेत बोलताना आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय सिंह म्हणाले की, तेजस्वी यादव बिहारमधील भारतीय जनता पक्षाचे दुकान बंद करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रियांका चतुर्वेदी आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्रात गुंतला आहे. मला सहा महिने तुरुंगात ठेवण्यात आले. माझ्या पक्षाचे अरविंद केजरीवाल, सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. आज संपूर्ण दिल्ली हेमंत सोरेन यांच्यासोबत आहे.

ते म्हणाले, जंगलात राहून आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्याला तुरुंगात टाकण्याची धमकी देण्याची हिंमत नरेंद्र मोदींनी करू नये. बाबासाहेबांच्या राज्यघटनेवर संपूर्ण देशाचा विश्वास आहे. मात्र दलित आणि गरिबांचे आरक्षण संपवणाऱ्या नागपूरच्या संविधानावर भाजपचा विश्वास आहे. संजय सिंह म्हणाले की, भाजपला आरक्षण संपवायचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT