BJP Candidate Sarvesh Kumar Death: Saamtv
लोकसभा २०२४

Loksabha Election: दुर्दैवी! मतदानाच्या दुसऱ्या दिवशी उमेदवाराचा मृत्यू; मतमोजणी होणार का? काय आहेत पर्याय? जाणून घ्या

BJP Candidate Sarvesh Kumar Death: कुंवर सर्वेश यांना भाजपकडून तिकीट मिळाले, तेव्हापासून ते रुग्णालयात दाखल होते. मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी उमेदवाराचा मृत्यू झाल्याने आता निवडणुक पुन्हा होणार का? याबाबतची चर्चा सुरू आहे.

Gangappa Pujari

भारतीय जनता पक्षाचे मुरादाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कुंवर सर्वेश सिंह यांचे शनिवारी सायंकाळी निधन झाले. वयाच्या ७१ व्या वर्षी दिल्ली एम्समध्ये सायंकाळी साडेसहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुंवर सर्वेश यांना भाजपकडून तिकीट मिळाले, तेव्हापासून ते रुग्णालयात दाखल होते. मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी उमेदवाराचा मृत्यू झाल्याने आता निवडणुक पुन्हा होणार का? याबाबतची चर्चा सुरू आहे.

निवडणुका रद्द होणार का?

सर्वेश सिंह यांच्या निधनाची बातमी समोर येताच राजकीय वर्तुळातून सर्वसामान्यांपर्यंत एक प्रश्न चर्चेचा विषय बनला आहे. वास्तविक कुंवर सर्वेश सिंह हे भाजपचे उमेदवार होते. मुरादाबाद जागेवरही निवडणूक पूर्ण झाली आहे. अशा स्थितीत मुरादाबादच्या जागेवर फेरनिवडणूक होणार का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

निर्णय मतमोजणीनंतरचं!

उमेदवाराच्या मृत्यूमुळे शुक्रवारी होणारी निवडणूक रद्द होणार का? या लोकसभा जागेवर पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे का? निवडणुका बाकी असताना उमेदवाराच्या मृत्यूनंतर कोणते पर्याय असू शकतात? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्या फक्त मुरादाबाद जागेवरच मतदान झाले आहे, सर्वेश सिंग किंवा अन्य उमेदवार जिंकणार की पराभूत होणार हे अद्याप ठरलेले नाही, त्यामुळे कोणताही निर्णय आता मतमोजणीनंतरच घेतला जाईल.

..तर पोटनिवडणूक लागणार

ज्येष्ठ पत्रकार प्रमोद गोस्वामी यांनी यावर तपशीलवार खुलासा करताना सांगितले की 'मुरादाबाद जागेवरील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अशा स्थितीत पोटनिवडणूक होण्याची शक्यता नाही. मतमोजणीच्या दिवशी सर्वेश सिंह विजयी झाल्यास किंवा सर्वेश सिंह यांचा पराभव होऊन अन्य कोणी उमेदवार विजयी झाल्यास तेच खासदार होतील, हे निश्चित आहे.

त्यावेळी पोटनिवडणुकीची गरज भासणार नाही. मात्र जर सर्वेश सिंह विजयी घोषित झाले, तेव्हा ते त्यांच्या लोकसभा मतदारसंघासाठी उपस्थित राहणार नाहीत, त्यामुळे ही निवडणूक रद्द होईल आणि पुन्हा निवडणूक होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मंगळसूत्र चोराचा...sss' जितेंद्र आव्हडांनी भाजप आमदाराला डिवचलं; नेमकं काय घडलं? VIDEO

Gulab Jam Recipe: तोंडात घालताच विरघळणारा खव्याचा गुलाबजाम कसा बनवायचा?

Shocking : धक्कादायक! ४५ वर्षांच्या व्यक्तीने केलं ६ वर्षीय मुलीशी लग्न, कुठे घडली घटना?

Relationship vs Friendship : रिलेशनशिप की फ्रेंडशिप कशात असतो जास्त फायदा?

Shocking: प्रसिद्ध इन्फ्लुएंसर अडकली होती वेश्याव्यवसायात; ६ वर्षानंतर अशी झाली सुटका; भयंकर अनुभव सांगताना म्हणाली...

SCROLL FOR NEXT