Pankaja Munde Shivshkti Daura Saamtv
लोकसभा २०२४

Pankaja Munde: विजयासाठी योगदान द्या; सालगड्यासारखं काम करेल... पंकजा मुंडेंची मतदारांना साद

Loksabha Election 2024: बीडमधील मेळाव्याला पंकजा मुंडेंसह, मंत्री धनंजय मुंडेही हजर होते. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यावर जोरदार टीका केली.

विनोद जिरे

बीड,|ता. ३ मे २०२४

राज्यात सध्या लोकसभेचा धुरळा सुरू आहे. लोकसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्यामुळे प्रचारसभांची रंगत वाढू लागली आहे. बीडमध्ये आज पंकजा मुंडे यांचा विजयी संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्याला पंकजा मुंडेंसह, मंत्री धनंजय मुंडेही हजर होते. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यावर जोरदार टीका केली.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

"कोणताही पराभव हा फायनल नसतो जोपर्यंत तुम्ही थांबत नाही. हा बीड जिल्हा महिला धार्जिन जिल्हा आहे. तुमचा खासदार काय करतो पाहा. पुढच्या दीड दोन वर्षात परळीपर्यंत रेल्वे धावणार. शेतकऱ्यांच्या पदरात विक्रमी विमा टाकणारी तुमची लेक म्हणते आपलं बघा. राजकारण छोटे चाळे करण्यासाठी राजकारण नसतं, मोठेमोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी असतं," असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

"जातीपातीचे राजकारण केले असते तर मला ज्या गावात १० - १२ मते होती, तिथे निधी दिला नसता. मात्र तिथं ३ - ३ कोटी निधी दिला. आता फक्त बुद्धीभेद सुरू आहे. संविधान बदलणार म्हणतात मात्र संविधान बदलण्याची ताकद कुणात नाही. ज्या बाबासाहेबांचे घर लंडनमध्ये आहे, ते घर आमच्या सरकारने खरेदी केलं. जर कुणावर अन्याय झाला तर मी दिवार बनून उभी राहील. जो सर्वसमावेशक राजकारण करू शकतो, त्याच्या पाठीमागे उभे रहा," असे आवाहन पंकजा मुंडेंनी यावेळी केले.

"एका महिलेला कुणी अडवलं तर माझा बीड जिल्हा तिला सन्मानच देतो. ज्यांनी मला अडवलं ते आता माझ्यासाठी कामाला लागले आहेत. ज्यांच्या घरात जरांगे पाटलांचा फोटो आहे, ते देखील म्हणाले ताई तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. विजय मिळवण्यासाठी योगदान द्या, अन माझ्याकडून विकास करून घ्या, सालगड्या सारख काम करेल, असे म्हणत साडेतीन माणसाला पकडायचं का साडेतीनशे खासदारांच्या पक्षाला पकडायचं हे ठरवा," असे आवाहन यावेळी पंकजा मुंडेंनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT