Jammu Kashmir Election Saam Tv
लोकसभा २०२४

Jammu Kashmir Election: लोकसभा निवडणुकीनंतर होणार जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका, निवडणूक आयोगाची घोषणा

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखांच्या घोषणेनंतर निवडणूक आयोगाने सांगितले की, लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

Satish Kengar

Jammu Kashmir Election 2024:

लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखांच्या घोषणेनंतर निवडणूक आयोगाने सांगितले की, लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेणे शक्य नाही. लोकसभा निवडणुका संपल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. सहा वर्षांपासून येथे विधानसभेची निवडणूक झालेली नाही, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३० सप्टेंबरपर्यंत निवडणुका होणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जम्मू-काश्मीरमध्ये 5 टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार

निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. देशभरात लोकसभा निवडणुका सात टप्प्यांत होणार आहेत. पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलपासून होणार आहे आणि १ जून रोजी शेतवताच्या टप्प्याचे मतदान होणार.  (Latest Marathi News)

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पाच टप्प्यात मतदान होणार आहे. येथे १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे रोजी निवडणूक होणार आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये ८७ लाख मतदार

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभेच्या पाच आणि लडाखमध्ये एक जागा आहे. संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये अंदाजे ८७ लाख मतदार आहेत. त्यापैकी ३.४ लाख मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात ११,६२९ मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत देशभरात ९६.८ कोटी मतदार मतदान करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत सुमारे १.८ कोटी मतदार आहेत जे पहिल्यांदाच कोणत्याही निवडणुकीत मतदान करणार आहेत. याशिवाय २० ते २९ वयोगटातील मतदारांची संख्या १९.४७ कोटी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT