Amol Kolhe, saam tv
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : अमोल कोल्हेंविरोधात महायुतीचा उमेदवार ठरला; मात्र पक्ष ठरेना, लवकरच निर्णय होणार

Amol Kolhe vs Shivajirao Adhalarao Patil : शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील महायुतीचे उमेदवारी असतील हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार हे अद्याप ठरलं नाही.

रोहिदास गाडगे

Shirur Loksabha News :

लोकसभा निवडणुकीत प्रतिष्ठेच्या बनलेल्या मतदारसंघांमध्ये शिरुरच्या जागेचा समावेश आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मात्र महायुतीकडून कोण उमेदवार असणार हे अद्याप स्पष्ट होताना दिसत नाही. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील महायुतीचे उमेदवारी असतील हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार हे अद्याप ठरलं नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढळराव पाटील यांना निवडणूक लढण्याचा कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहे. आता पक्षचिन्ह कुठलं यापेक्षा मी महायुतीचा उमेदवार असल्याचे स्पष्ट संकेत आढळराव पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे शिरुरच्या मैदानात अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील अशीच लढत पुन्हा एकदा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली. यावेळी अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर आढळराव पाटील तुम्ही महायुतीचेच उमेदवार आहात. तुम्ही निवडणूक लढण्यासाठी कामाला लागा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं आढळराव पाटलांनी सांगितलं.

आता पक्ष कुठला चिन्ह कुठलं यापेक्षा मी महायुतीचा उमेदवार आहे. यासाठी मिशन ४८ घेऊन पक्ष विचार बाजूला ठेवून देशाच्या उज्ज्वल भवितव्य,धोरण घेऊन तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागलोय. जागावाटपाचा तिढा आज-उद्यापर्यंत सुटेल. मात्र पक्ष चिन्ह कुठलं यापेक्षा मी महायुतीचा उमेदवार असेल, असे स्पष्ट संकेत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT