Happy marriage study saam
लाईफस्टाईल

जाडी बायको असणारे पुरुष आयुष्यात सर्वाधिक आनंदी, नव्या संशोधनात नेमकं काय?

Happy marriage study : जाडी किंवा सुडौल बायको असलेल्या पुरुषांचे जीवन अधिक आनंदी असते का? आंतरराष्ट्रीय संशोधनातून समोर आलेले धक्कादायक पण रंजक निष्कर्ष जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

relationship happiness research overweight partners : सडपातळ बांधा असणारी मुलगी बायको म्हणून कुणाला नको असते. मात्र, आता परदेशी विद्यापीठानं केलेल्या एका संशोधनानं जगभरातील पुरूषांना नवा विचार करायला भाग पाडलंय. विद्यापीठानं केलेलं संशोधन नेमकं काय आहे ? जाडी बायको सुखी संसारासाठी कशी कारणीभूत ठरतेय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

सडपातळ बांधा, उंच शरीरयष्टी आणि झिरो फिगर असणाऱ्या मुलींना बायको म्हणून पहिली पसंती असते...असा विचार जर तुम्हीही करत असाल तर थांबा... कारण प्रत्यक्षात ज्याची बायको सुडौल किंवा जाडी असते ते पुरुष आयुष्यात सर्वाधिक आनंदी असतात? हे आम्ही म्हणत नाही तर ही गोष्ट एका आंतरराष्ट्रीय संशोधनात सिद्ध झालीय..मेक्सिकोच्या राष्ट्रीय स्वायत्त विद्यापीठाने अनेक जोडप्यांच्या लाईफस्टाईलचा अभ्यास केला आणि अभ्यासाअंती धक्कादायक पण रंजक असं वास्तव समोर आलयं... ज्या बायकांचे वजन जास्त आहे, त्यांचे जोडीदार हे सडपातळ स्त्रियांच्या जोडीदारांपेक्षा 10 पट जास्त आनंदी असतात, असं संशोधनात सिध्द झालंय... सुडौल बायको असणाऱ्या पुरुषांच्या आनंदी असणाऱ्यामागे कोणती कारण आहेत... पाहूयात...

सुडौल महिला आपल्या जोडीदारावर डाएट करण्यासाठी किंवा जिममध्ये जाण्यासाठी दबाव टाकत नाहीत. या महिला अधिक हसमुख असतात. तसंच त्यांची विनोदबुद्धी चांगली असते, ज्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहतं...तसंच सुडौल महिला नात्यातील ताणतणाव आणि समस्या अधिक सहजपणे हाताळतात, असा दावा ही या संशोधनात करण्यात आलाय...विशेष म्हणजे सुडौल महिला महागड्या भेटवस्तूंऐवजी छोट्या भेटवस्तूंनीही आनंदी होतात.. ज्यामुळे जोडीदारावरील मानसिक ताण कमी असतो...त्यामुळे जीवनाकडे हे जोडपं सकारात्मक दृष्टीकोनातून बघते...

याउलट, सडपातळ महिलांच्या जोडीदारा बाबतीत असे दिसून आलयं की, ते आपल्या भावना व्यक्त करताना थोडे संकोची असतात. अर्थात, आनंदाचं हे मोजमाप फक्त वजनावर अवलंबून नसतं, तर ते एकमेकांवरील विश्वासावर असतं. पण मेक्सिकोच्या या संशोधनानं जगभरातील पुरुषांना एक नवीन विचार करायला नक्कीच भाग पाडलंय..त्यामुळे आता 'झिरो फिगर'पेक्षा 'हॅप्पी फिगर'कडं कल वाढल्यास नवल वाटायला नको.

ब्युरो रिपोर्ट, साम टिव्ही न्यूज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : उत्तर पुणे जिल्ह्यात तापमान ४२° पार; उष्माघाताचा धोका वाढला

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप, तब्बल ९० प्रमुख पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, धक्कादायक कारण आले समोर

नवी मुंबई विमानतळ व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी जाहीर, कुणाची झाली निवड?

Accident : पुण्यातील लग्नाहून परत येताना भीषण अपघात, रिक्षाला जोरात धडक, २ जणांचा जागीच मृत्यू

दरवाढीचा भडका! LPG सिलिंडर तब्बल ९९३ रुपयांनी महागला; वाचा तुमच्या शहरातील ताजे दर

SCROLL FOR NEXT