Thumb shape personality test saam tv
लाईफस्टाईल

Personality test: तुमच्या अंगठ्याचा आकार सांगतो तुमच्या व्यक्तिमत्त्वाची गुपितं! जाणून घ्या सामुद्रिक शास्त्र काय सांगतं?

Thumb shape personality test: या आर्टिकलमधून आम्ही तुम्हाला अंगठ्याच्या आकारातून मिळणाऱ्या संकेतांबद्दल सांगणार आहोत. एखाद्याच्या अंगठ्याचा आकार काय आहे आणि त्याच्या आकारावरून तुम्हाला त्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीबाबत काय कळू शकतं हे पाहूयात?

Surabhi Jayashree Jagdish

प्रत्येक गोष्टीला एका शास्त्राचा आधार असतो. ज्योतिष्य शास्त्राप्रमाणेच सामुद्रिक शास्त्र देखील असतं. सामुद्रिक शास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीच्या शरीराच्या विविध भागांद्वारे त्याच्या स्वभाव आणि भविष्याविषयी माहिती मिळवता येते.

यामध्ये तुमचे डोळे, कपाळ, तीळ, नाक, भुवया, बोटं, तळहात किंवा अंगठा यांचा समावेश असतो. या आर्टिकलमधून आम्ही तुम्हाला अंगठ्याच्या आकारातून मिळणाऱ्या संकेतांबद्दल सांगणार आहोत. एखाद्याच्या अंगठ्याचा आकार काय आहे आणि त्याच्या आकारावरून तुम्हाला त्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीबाबत काय कळू शकतं हे पाहूयात?

अंगठा लांब आणि बारीक असेल

ज्या व्यक्तीचा अंगठा लांब आणि पातळ असतो त्याचा स्वभाव खूप चांगला आणि गोड असतो असं मानलं जातं. हे लोक कलात्मकतेने परिपूर्ण असतात, असं मानलं जातं. याशिवाय हे लोक कठीण परिस्थितीतही खंबीरपणे उभे असतात.

अंगठ्याचा आकार फारच लांब असेल...

बऱ्याच लोकांचा अंगठा खूप लांब असतो, जो समुद्र शास्त्रात चांगला मानला जात नाही. याचं कारण म्हणजे जर अंगठ्याची लांबी तर्जनीच्या दुसऱ्या पोरपेक्षा जास्त असेल तर ती व्यक्ती कपटी असते, असं म्हटलं जातं. शिवाय असे लोकं त्यांच्या कामात यशस्वी होऊ शकत नाहीत, असंही मानलं जातं.

अंगठा काहीसा झुकला असेल तर...

जर एखाद्या व्यक्तीचा अंगठा काही प्रमाणात झुकलेला असेल तर अशा व्यक्तीचा स्वभाव मनमिळाऊ असतो. या लोकांमध्ये अजिबात अहंकार नसतो. इतरांशी ते अतिशय सामंजस्याने काम करतात. हे ज्य ठिकाणी जातात त्यानुसार स्वतःला बदलतात.

अंगठा फार लवचिक असेल तर..

अनेक लोकांचा अंगठा खूप लवचिक असतो आणि तो वाकवताना खूप मागे जातो. अशा लोकांचा स्वभाव अतिशय अहंकारी असतो. अशा व्यक्तींचं मन कोणत्याही एका कामात गुंतलेलं नसतं. असे लोक कोणत्याही अर्थाशिवाय आपली शक्ती वाया घालवतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती सामुद्रिक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave party Case : प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, एकनाथ खडसे यांच्याकडून गंभीर आरोप; पुणे पोलीस आयुक्तांकडून स्पष्टीकरण

Raigad : रायगडमध्ये मासेमारी बंदीच्या आदेशाचे उल्लंघन! 38 मच्छिमारांवर कारवाई | VIDEO

दह्यासोबत हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, फूड पॉयझनचा असतो धोका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू, मंचावर भाजप नेत्याच्या डुलक्या; व्हिडिओ व्हायरल

Narali Purnima 2025: यंदा नारळी पौर्णिमा कधी आहे?

SCROLL FOR NEXT