आपल्या शरीरातील किडनी हा अत्यंत महत्वाचा अवयव आहे. किडनी शरीरातील घाण, विषारी द्रव्यं आणि अतिरिक्त पाणी बाहेर टाकतात. याशिवाय ते इलेक्ट्रोलाइट्सचा समतोल राखतात आणि रक्तदाब नियंत्रित करतात. यामुळे लाल रक्तपेशी तयार होण्यास मदत होते. दुर्दैवाने, किडनी बिघडण्याची सुरुवातीची लक्षणं ही खूप सौम्य असतात. ही लक्षणं इतर आजारांसारखी वाटतात म्हणूनच अनेक वेळा लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.
क्रॉनिक किडनी डिसीज हा आजार हळूहळू वाढतो. मात्र सुरुवातीलाच जर त्याची लक्षणं ओळखली गेली, तर त्याला आळा घालता येतो. खाली अशा ४ लक्षणांबाबत सांगण्यात आलंय. जी दिसली की तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन किडनी तपासणी केली पाहिजे.
किडमी बिघडत असल्याची पहिली लक्षणं आपल्या लघवीतून दिसून येतात. जसं की रात्री वारंवार लघवी लागणं, लघवीमध्ये फेस दिसणं लघवीत रक्त दिसणं किंवा खूप गडद पिवळी-काळसर रंगाची दिसणं. ही लक्षणं सामान्य वाटली तरी दुर्लक्षित केल्यास पुढे गंभीर त्रास निर्माण होतो.
जेव्हा किडनी आपल्या शरीरातील अतिरिक्त पाणी आणि मीठ नीट बाहेर टाकू शकत नाही, तेव्हा ते शरीरात साठू लागते. परिणामी टाचांभोवती, पायांमध्ये किंवा डोळ्यांखाली सूज येऊ लागते. अनेकजण याला फक्त आहार किंवा उभं राहणं कारणीभूत ठरतं असं समजतात. पण ही सूज किडनी फेल्युअरचं संकेत असू शकतं.
किडनी जर नीट कार्य करत नसेल तर शरीरात कॅल्शियम आि फॉस्फरसचं प्रमाण बिघडतं आणि रक्तातील टॉक्सिन्स वाढतात. यामुळे त्वचा कोरडी होते आणि सारखी खाज येते. याला त्वचेचा कोणताही रोग नसतो, त्यामुळे त्याचं मूळ किडनीमध्ये असू शकतं.
किडनीची कार्यक्षमता कमी झाली की युरिया आणि इतर घातक पदार्थ शरीरात साठतात. रुग्णाला काहीही खावंसं वाटत नाही. यावेळी तोंडात धातूसारखा वास किंवा चव येते आणि मळमळही होते. बर्याचदा या लक्षणांमुळे पचनसंस्थेचा त्रास वाटतो, पण मूळ कारण हे किडनीशी संबंधित असतं.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.