गुरुवार हा विष्णू आणि बृहस्पतीला अर्पित दिवस आहे.
गायीला चणे-गूळ देणे नशीब बदलण्यास मदत करते.
“ॐ ऐं क्लीं बृहस्पतये नमः” हा मंत्र जपावा.
गुरुवार हा दिवस भगवान श्रीहरी विष्णू आणि देवगुरु बृहस्पति यांना अर्पण केलेला मानला जातो. या दिवशी श्रद्धेने पूजन आणि काही सोपे उपाय केल्यास आयुष्यातील करिअरपासून ते कौटुंबिक जीवनातील अडचणी, दु:ख-संकटं दूर होऊ शकतात. चला तर जाणून घेऊया गुरुवारी कोणते खास उपाय करायचे आहे.
गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि भगवान विष्णूंच्या चरणी मनोभावे प्रार्थना करावी. त्यानंतर गायीला चण्याची डाळ आणि गूळाचा नैवेद्य अर्पण करावा. हा उपाय नियमित केल्यास आयुष्यातील कामांमध्ये अडथळा येत नाहीत. याशिवाय तुमचं नशीब बदलण्याची शक्यता आहे.
आपली बौद्धिक क्षमता आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी गुरुवारी एक विशेष उपाय करावा. स्नान-ध्यान करून देवगुरु बृहस्पतींच्या मंत्राचा जप करावा – “ॐ ऐं क्लीं बृहस्पतये नमः”. हा मंत्र किमान २१ वेळा म्हणावा. यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते आणि विचार करण्याची ताकद बळकट होते.
ज्यांना व्यापारात वाढ हवी आहे त्यांनी गुरुवारी भगवान विष्णूंना चंदनाचा तिलक करावा आणि चंदनाच्या सुगंधी अगरबत्त्या दाखवाव्यात. या उपायामुळे व्यवसायातील नवीन संधी मिळतात, डील्स पक्क्या होतात आणि धनवृद्धीचे मार्ग उघडतात.
शत्रूंचा त्रास टाळण्यासाठी गुरुवारी खास उपाय करावा. यासाठी पिवळा रंगाचा एक लहान कपडा घ्या आणि एका वाटीत थोडेसं पाणी घेऊन त्यात हळद मिसळा. त्या हळदीच्या पाण्याने कपड्यावर शत्रूचे नाव लिहा आणि तो कपडा भगवान विष्णूंच्या मंदिरात अर्पण करा. या उपायाने शत्रूवर मात करण्याचे मार्ग खुले होतात.
गुरुवारी नेहमी घरातील ज्येष्ठांचा सन्मान करा आणि त्यांच्याशी प्रेमाने वागा. भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना आंब्याचा रस नैवेद्य म्हणून अर्पण करा. त्यानंतर तो प्रसाद स्वतः घ्यावा आणि घरातील मोठ्यांमध्ये वाटावा. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि कुंडलीतील गुरु ग्रह अधिक बळकट होतो.
गुरुवारचा दिवस कोणाला अर्पित आहे?
गुरुवार हा भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पतीला अर्पित आहे.
विष्णूची पूजा करताना गायीला काय अर्पण करावे?
चण्याची डाळ आणि गूळ गायीला अर्पण करावा.
बुद्धी आणि ज्ञान वाढवण्यासाठी कोणता मंत्र जपावा?
“ॐ ऐं क्लीं बृहस्पतये नमः” हा मंत्र किमान २१ वेळा जपावा.
व्यवसायात प्रगतीसाठी कोणता उपाय करावा?
विष्णूला चंदनाचा तिलक आणि सुगंधी अगरबत्त्या अर्पण कराव्यात.
घरातील मोठ्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काय करावे?
ज्येष्ठांचा सन्मान करून आंब्याचा रस त्यांना नैवेद्य म्हणून द्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.