Weight Loss Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Weight Loss Tips: जीम किंवा डाएट न करताही अडीच महिन्यात कमी करू शकता 10 किलो वजन; डॉक्टरांनी सांगितले ३ सोपे उपाय

Weight Loss Tips Without Gym by Doctor: वजन कमी करण्यासाठी जिमला जाणं किंवा स्ट्रिक्ट डाएट पाळणं आवश्यक नाही. डॉक्टरांच्या मते, काही सोप्या जीवनशैलीतील बदलांमुळे दोन अडीच महिन्यांत १० किलो वजन कमी करता येतं.

Surabhi Jayashree Jagdish

आपण फीट आणि फाईन असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. यामध्ये अनेकांना वाढलेलं वजन कमी करायचं असतं. वजन कमी करण्याचा विचार केला की, अनेकांच्या मनात जीम आणि डाएटचा विचार येतो. मात्र डॉ. मल्हार गानला यांनी लोकांचा हा समज काहीसा बदलला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी असा दावा केलाय, की कोणत्याही कठोर व्यायामाशिवायही केवळ अडीच महिन्यांत १० किलो वजन कमी करता येतं.

डॉ. गानला यांच्या मते, वजन कमी करणं ही शारीरिक श्रमापेक्षा शरीरातील पौष्टिक संतुलन आणि निरोगी सवयींची बाब आहे. अनेकदा लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात स्वतःला उपाशी ठेवतात. ज्यामुळे शरीर अशक्त होतं आणि मेटाबॉलिझम प्रक्रिया मंदावते.

आजकाल सर्वजण त्यांच्या कामात व्यस्त असतात. अशा स्थितीत व्यायाम किंवा डाएटच्या वेळा पाळणं कठीण होतं. अशा व्यक्तींसाठी ही सोपी ट्रीक एक आशेचा किरण ठरणार आहे. यामध्ये डॉक्टरांनी तीन मूलभूत टिप्स दिल्यात. ज्यामुळे शरीराला अंतर्गतरित्या स्थिर होण्यास आणि नैसर्गिकरित्या फॅट कमी करण्यास मदत होऊ शकते.

भूक मारणं बंद करा

डॉ. गानला यांचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा सल्ला दिला तो म्हणजे भूक मारणं बंद का. जेव्हा शरीराला आवश्यक पोषक तत्वं मिळत नाहीत तेव्हा ते वारंवार भूक लागल्याचे संकेत देतं. यावेळी त्यांनी शरीराची पोषक तत्वांची लिस्ट दिली. आहारासोबत दररोज मल्टीविटामिन सप्लिमेंट देखील घेतलं पाहिजे. यामुळे अनावश्यक खाण्याची इच्छा दूर होईल.

बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद करा

वजन कमी करण्याची दुसरी स्टेप म्हणजे घरी बनवलेलं जेवण तुम्ही जेवलं पाहिजे. डॉक्टर बाहेरील जंक फूड आणि प्रोसेस्ड केलेलं अन्न पूर्णपणे टाळण्याचा सल्ला दिलाय. तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा कामावर जात असाल नेहमी तुमच्यासोबत घरी बनवलेला जेवणाचा डबा सोबत ठेवा.

सुरुवातीला जीमला जाऊच नका

आश्चर्याची बाब म्हणजे डॉक्टरांन पहिल्या अडीच महिन्यांत जड व्यायाम न करण्याचा सल्ला दिलाय. त्याऐवजी त्यांनी हलकं चालणं, लिफ्टऐवजी पायऱ्या वापरणं आणि सूर्यनमस्कार सारख्या योगासनांचा सराव करण्याचा सल्ला देतात. एकदा तुमचं शरीर या बदलांशी जुळवून घेऊ लागलं आणि तुमचं वजन कमी होऊ लागले की, तुम्ही जिमला जाण्याचा विचार करू शकता.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT