Cheapest Recharge Saam Tv
लाईफस्टाईल

Cheapest Recharge : आता दर महिन्याला रिचार्जचे टेन्शन नको, 'या' कंपन्या देताय सर्वात स्वस्त रिचार्ज !

Jio ने काही काळापूर्वी सर्वात स्वस्त रिचार्ज देऊन अधिक ग्राहक त्यांच्याकडे वळवले होते.

कोमल दामुद्रे

Cheapest Recharge : भारतात सध्या Airtel, jioआणि VI हे तीन टेलिकॉम कंपन्या चर्चेत आहेत.तर BSNL या सरकारी कंपनीकडे सर्वांनी पाठ फिरवलेली दिसून येते तर जिओने काही काळापूर्वी सर्वात स्वस्त रिचार्ज देऊन अधिक ग्राहक त्यांच्याकडे वळवले होते.

त्यानंतर Airtel,VI या टेलिकॉम कंपन्यानीसुद्धा त्यांच्या प्लॅन मध्ये बदल केले आणि आता जवळजवळ सर्वच टेलिकॉम कंपन्याचे रिचार्ज प्लॅन सारखेच झालेले दिसून येते त्यामुळे सर्वात स्वस्त रिचार्ज कोणते हे समजून येत नाही.

प्रत्येक महिन्यात रिचार्ज करण्यापासून सुटका पाहिजे असेल आणि सोबतच अनलिमिटेड कालिंग पाहिजे असेल तर जाणून घेऊया एक वर्षाच्या वैधतेसह सर्वात स्वस्त प्लॅन कोणता आहे.

1. Airtel प्लान

Airtel च्या १ वर्षाच्या वैधतेच्या प्लॅन ची किंमत १,७९९ रुपये आहे.प्लॅनची वैधता ३६५ दिवसांनसाठी आहे. या प्लॅन मध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग ची सुविधा मिळणार आहे आणि ३६०० एसएमएस १ वर्षासाठी फ्री (free) मिळणार आहेत. २४जिबी डेटा वापरता येईल तसेच डेटा समाप्त झाल्यानंतर तुम्ही इतर डेटा प्लॅन अॅक्टिवेट करून आनंद घेऊ शकता.फ्री म्यूझिक चे सबस्क्रिपशन या प्लॅन मध्ये उपलब्ध आहे.

2. Jio प्लान

Jio च्या प्लानमध्ये सर्व नेटवर्क वर अनलिमिटेड कॉलिंग ची सुविधा आहे सोबतच ३३६ दिवसांनसाठी ३६०० एसएमएसची सुविधा आहे.२ जीबी डेटा तुम्हाला या प्लॅन मध्ये वापरता येईल.डेटा समाप्त झाल्यावर तुम्ही डेटा एन्ड ऑन प्लॅन वरून रिचार्ज करू शकता या प्लॅन ची किंमत १५५९ रुपये आहे.जियो हॅलो टिऊनचा आनंद तुम्हीं मिळवू शकता.जियो सिनेमा,जियो सावन, जियो टीवी फ्री सबस्क्रिपशन या प्लॅन मध्ये मिळते.

3. BSNL

BSNL १ वर्षाच्या प्लॅन ची किंमत १५७० रुपये आहे.या प्लॅन मध्ये दररोज २जीबी डेटा मिळेन सोबतच रोज १००एसएमएस फ्री आणि सर्व नेटवर्क वर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. डेटा वापरताना तुम्हाला कोणताही नेटवर्क प्रॉब्लेम येणार नाही याची खात्री कंपनी देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident News : देवदर्शन घेऊन निघाले, ४ किमीनंतर भयानक अपघात, नवले ब्रिजवर अख्ख्या कुटुंबाचा अंत

Maharashtra Live News Update: नवले ब्रीज अपघात प्रकरणी मुरलीधर मोहोळ घटनास्थळी पाहणी करणार

लग्नसराईत सोनं स्वस्त! २४ कॅरेट १० तोळं सोन्याचे भाव ८ हजारांनी घसरले, वाचा आजचा लेटेस्ट दर

Bihar Election Result Live Updates: तेजस्वी यादव फक्त ८०० मतांनी आघाडीवर

Bihar Election Result: सत्तेच्या चाव्या ६ मतदारसंघात, या ठिकाणी जिंकणाऱ्यांचेच सरकार, पाहा १९७७ पासूनचा ट्रेंड काय सांगतो...

SCROLL FOR NEXT