Xiaoma Small Electric Car Saam Tv
लाईफस्टाईल

Mini Electric Car: मिनी पण जबरदस्त; टू-डोअर इलेक्ट्रिक कार अवघ्या 3.47 लाखात लॉन्च; एका चार्जमध्ये मुंबई-पुणे 4 फेऱ्या मारता येतील...

Xiaoma Small Electric Car: मिनी पण जबरदस्त; टू-डोअर इलेक्ट्रिक कार अवघ्या 3.47 लाखात लॉन्च; एका चार्जमध्ये मुंबई-पुणे 4 फेऱ्या मारता येतील...

Satish Kengar

Xiaoma Small Electric Car Launch:

चीनच्या फर्स्ट ऑटो वर्क्सची (FAW) मायक्रो-EV सेगमेंटमध्ये पकड निर्माण करण्याची योजना आहे. यासाठी कंपनीने बेस्टून ब्रँड अंतर्गत Xiaoma Small Electric कार लॉन्च केली आहे. या महिन्यापासून या इलेक्ट्रिक कारची प्री-सेल्स सुरू होणार आहे.

Xiaoma Small Electric Car थेट Wuling Hongguang Mini EV So शी स्पर्धा करेल. सध्या ही चीनमध्ये सर्वाधिक विकली जाणारी मायक्रो कार आहे. Xiaoma इलेक्ट्रिक कारची किंमत 30,000 ते 50,000 युआन (सुमारे 3.47 लाख ते 5.78 लाख रुपये) दरम्यान असेल.

FAW ने या वर्षाच्या सुरुवातीला शांघाय ऑटो शोमध्ये बेस्टुन शाओमा सादर केली होती. याच हार्डटॉप आणि convertible दोन्ही प्रकार सादर केले गेले. सध्या फक्त हार्डटॉप प्रकार विकला जाईल. convertible व्हेरिएंट भविष्यात विक्रीसाठी आणले जाईल की नाही, याची अद्याप माहिती मिळाली नाही. या कारमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट देखील आहे. याच्या डॅशबोर्डला आकर्षक ड्युअल-टोन थीम मिळते. (Latest Marathi News)

अधिक आकर्षक प्रोफाइलसाठी यात गोलाकार कोपऱ्यांसह मोठे चौकोनी हेडलॅम्प आहेत. शाओमामध्ये एरोडायनामिक चाके वापरनियत आली आहेत. जी रेंज वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. यामध्ये मागील बाजूचे टेल लॅम्प आणि बंपर एकाच थीमचे आहेत.

किती देते रेंज?

बेस्टून शाओमा FME प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यामध्ये ईव्ही आणि रेंज एक्स्टेन्डर डेडिकेटेड चेसिसचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी, या प्लॅटफॉर्मवर NAT नावाची राइड-हेलिंग ईव्ही तयार करण्यात आली होती. FME प्लॅटफॉर्ममध्ये A1 आणि A2 असे दोन उप-प्लॅटफॉर्म आहेत.

A1 उप-प्लॅटफॉर्म 2700-2850 मिमीचा व्हीलबेस असलेल्या सबकॉम्पॅक्ट आणि कॉम्पॅक्टची पूर्तता करते. A2 चा वापर 2700-3000 मिमी व्हीलबेस असलेल्या कारसाठी केला जातो. कंपनीने दावा केला आहे की, ही कार एका चार्जमध्ये 800Km ते 1200Km रेंज देऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माझ्या विजयाचं लीड ५ हजारांंपेक्षा जास्त असेल - श्रद्धा जाधव

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT