Bike  Saam TV
लाईफस्टाईल

Bike : महागड्या पेट्रोलची चिंता मिटली; सामान्यांच्या खिशाला परवडणारी ही बाईक देते अफलातून मायलेज

भारतामध्ये २०२३ पासून ७२,२२४ रुपयांना ही बाईक शोरूममध्ये ठेवण्यात येत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Bike: पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. महागाईचा भडका उडाल्याने सर्वसामान्य नागरिकांना बाईक खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागत आहे. आता तुम्ही देखील नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला कमी किंमतीची मात्र जास्त मायलेज देणारी बाईक (Bike) हवी असेल तर बजाज कंपनीने खास तुमच्यासाठी एक शानदार बाईक लॉंच केली आहे. या बाईकची किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे. चला तर मग या बाईकची सर्व माहिती जाणून घेऊ. (Latest Marathi News)

बजाज कंपनीची नवीन बाईक

बजाज ऑटो या कंपनीने नुकतीच एक शानदार बाईक बाजाराच आणली आहे. Bajaj Platina 110 ABS या बाईकचे मॉडेल फार दमदार आहे. यात पॉवरिंग ११५.४५ आहे. तर सीसी सिंगल-सिलेंडर देण्यात आला आहे. एअर कूल्ड, इंजेक्टेड इंजिनसह ७००० आरपीएमवर ८.४ बीएचपी दिले आहे. तसेच ५००० आरपीएमवर ९.८१ इतका एनएम पीक टॉर्क दिला आहे.

या बाईकमध्ये टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आहे. तसेच मागील बाजूला ड्युअल स्प्रिंग-लोडेड शॉक शोषक आहे. Bajaj Platina 110 ABS बाईकचे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडले आहे. डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील देण्यात आला आहे. या बाईकमध्ये तुम्हाला गियर गाईडन्स, गीअर पोझिशन यासह एबीएस मिळेल.

किती आहे किंमत?

Bajaj Platina 110 ABS या बाईकची किंमत तुमच्या खिशाला परवडणारी आहे. भारतामध्ये २०२३ पासून ७२,२२४ रुपयांना ही बाईक शोरूममध्ये ठेवण्यात येत आहे. एबीएसबरोबर बजाज कंपनीची ११०सीसी सेगमेंट असलेली ही पहिलीच बाईक आहे. यात तुम्हाला चार कलर ऑप्शन मिळतील. सर्वसामान्यांच्या स्वप्नातील आणि खिशाला परवडेल अशीच ही बाईक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

SCROLL FOR NEXT