ATM Machine Saam Tv
लाईफस्टाईल

ATM Machine : 'हे' आहे जगातील सर्वात उंच एटीएम, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने ही घेतली दखल

तुम्हाला माहित आहे का की, जगातील सर्वात उंच एटीएम कुठे आहे आणि लोक तिथे कसे जातात?

कोमल दामुद्रे
ATM Machine

आजच्या काळात एटीएम किती उपयुक्त आहे हे तुम्हाला माहीत असेलच. त्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की लोक दिवसा किंवा रात्री कधीही पैसे काढू शकतात. तुम्हाला जवळपास सर्वत्र एटीएम सापडतील, पण तुम्हाला माहित आहे का की, जगातील (World) सर्वात उंच एटीएम कुठे आहे आणि लोक तिथे कसे जातात? (Latest Marathi News)

ATM Machine

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगातील सर्वात उंच 'कॅश मशीन' म्हणजेच ATM चीन आणि पाकिस्तानमधील (Pakistan) खंजराब पासच्या सीमेवर आहे आणि येथे येण्यासाठी लोकांना डोगररांगातून जावे लागते.

ATM Machine

4693 मीटर उंचीवर बांधलेले हे एटीएम 2016 मध्ये बसवण्यात आले होते. इतक्या उंचीवर असल्याने या एटीएमचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.

ATM Machine

हे एटीएम 'नॅशनल बँक ऑफ पाकिस्तान'ने बसवले आहे. एवढ्या उंचीच्या परिसरात विजेची सोय नसल्याने हे एटीएम चालवण्यासाठी सौरऊर्जा आणि पवन ऊर्जेची मदत घेण्यात आली आहे.

ATM Machine

एटीएम मशिनचा वापर नागरिक, सीमा सुरक्षा दल आणि सीमाभागाजवळ राहणारे पर्यटक करत आहेत. यासोबतच ते पर्यटकांना स्वतःकडे आकर्षित करते. या एटीएममधून पैसे काढणाऱ्या अनेक पर्यटकांनी 'आकाशातून पैसे काढल्यासारखे' वाटत असल्याचे सांगितले. या एटीएमला भेट देणे आणि येथून पैसे काढतानाची छायाचित्रे क्लिक करून त्यांना त्यांच्या आठवणींमध्ये जपणे पर्यटक हा सन्मान मानतात.

ATM Machine

एटीएमचे निरीक्षण करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याने बीबीसीला सांगितले की हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे चार महिने लागले. येथून सर्वात जवळील NBP बँक ८७ किलोमीटर अंतरावर आहे. खराब हवामान, अवघड डोंगररांगा आणि दरड कोसळून बँकर्स पैसे काढण्यासाठी या एटीएममध्ये जातात. त्यांनी सांगितले की, येथून 15 दिवसांत सरासरी 40-50 लाख रुपये काढले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT