World Suicide Prevention Day 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

World Suicide Prevention Day 2023 : कोणत्या उद्देशाने दरवर्षी साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Shraddha Thik

Why Celebrate World Suicide Prevention Day 2023 :

आजकाल लोक त्यांच्या जीवनशैलीतील बदलांमुळे अनेक समस्यांना बळी पडत आहेत. आजकाल अनेक लोक मानसिक समस्यांना बळी पडतात. जगभरातील अनेक लोक तणाव आणि नैराश्याशी झुंजत आहेत.

हा एक प्रकारचा गंभीर मानसिक (Mental) विकार आहे, ज्यावर योग्य उपचार न केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. अनेक लोक नैराश्याला बळी पडतात आणि आत्महत्याही करतात. अशी प्रकरणे अनेकवेळा समोर येत आहेत.

आत्महत्या ही एक गंभीर समस्या आहे, जी संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे. अशा परिस्थितीत या गंभीर समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी 10 सप्टेंबर रोजी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन (WSPD) साजरा केला जातो. आत्महत्या रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबद्दल लोकांना शिक्षित आणि जागरूक करण्यासाठी हा दिवस साजरा (Celebrate) केला जातो. त्याचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेऊया-

या दिवसाचा इतिहास काय आहे?

सध्या जगभरात त्याची प्रकरणे चिंताजनक वेगाने वाढत आहेत. आत्महत्या ही एक मोठी समस्या आहे, जी समाजातून दूर करण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न केले जात आहेत. अशा स्थितीत आत्महत्या रोखण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय महासंघ आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांनी 2003 साली जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन (WSPD) सुरू केला . त्याअंतर्गत दरवर्षी 10 सप्टेंबर रोजी संघटना, सरकार आणि सर्वसामान्य जनतेला आत्महत्येबाबत जागरूक होऊन ते रोखण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

महत्त्व

हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश लोकांपर्यंत पोचवणे हा आहे की आत्महत्या रोखल्या जाऊ शकतात. त्याच वेळी, त्यांना हे देखील सांगावे लागेल की आत्महत्येशिवाय जीवनात इतर चांगले पर्याय आहेत. याशिवाय या दिवसाचे महत्त्व (Importance) म्हणजे आत्महत्येशी संबंधित कलंक कमी करणे आणि अशा समाजाला प्रोत्साहन देणे, जिथे लोक मदतीसाठी मागेपुढे पाहत नाहीत.

थीम

एका विशेष उद्देशाने साजरा केला जाणारा हा दिवस दरवर्षी एका खास थीमसह साजरा केला जातो. यंदाही या दिवसासाठी खास थीम निवडण्यात आली आहे. यावेळी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त “क्रिएटिंग होप थ्रू अॅक्शन” हा निर्णय घेण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT