World Tobacco Day Saam TV
लाईफस्टाईल

World Tobacco Day : कितीही प्रयत्न केले तरी तंबाखूचं व्यसन सुटत नाहीये; मग आजपासूनच ही थेरेपी सुरू करा

World No-Tobacco Day 2024: तंबाखूच्या व्यसनावर निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी करता येते. NRT द्वारे तंबाखूचे सेवन 70% पर्यंत कमी केले जाऊ शकते, असे आयएएनएस (IANS) अहवालात म्हटले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आज तंबाखू दिन आहे. दरवर्षी ३१ मे रोजी तंबाखू दिन साजरा केला जातो. तंबाखू खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होतात. अनेकांचा मृत्यू देखील होतो. त्यामुळे तंबाखू खाणाऱ्या व्यक्तींमध्ये या दिवशी जनजागृती केली जाते. तंबाखूमुळे होणारे त्रास तंबाखू खाणाऱ्या व्यक्तीला देखील चांगल्याप्रकारे माहिती असतात. मात्र लागलेलं व्यसन त्यांना सहज सोडणं कठीण होतं. त्यामुळे आज तंबाखूचं व्यसन कसं सोडायचं याची महिती जाणून घेणार आहोत.

तंबाखूच्या व्यसनावर निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी करता येते. NRT द्वारे तंबाखूचे सेवन 70% पर्यंत कमी केले जाऊ शकते, असे आयएएनएस (IANS) अहवालात म्हटले आहे. त्यामुळे निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी काय आहे? ते कसे काम करते? याची माहिती पुढे पाहू.

तंबाखूमधील व्यसन वाढवणारा घटक

निकोटीन हा तंबाखूमध्ये सर्वाधिक सापडणारा घटक आहे. या घटकामुळेच व्यक्तींना सतत तंबाखू खावी वाटते. त्याचे व्यसन सोडण्याचा प्रयत्न केला तरी व्यसन सुटत नाही. निकोटीन रक्तातून एड्रेनालाईनमध्ये जाते आणि एड्रेनालाईन हे रसायन सोडते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो.

निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी

निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी केल्याने तुम्हाला तंबाखू खाण्याची आठवण करून देणाऱ्या निकोटीनवर मात करता येते. निकोटीची मात्रा जास्त असलेली औषधे तुम्हाला या व्यसनातून मुक्त करू शकतात. यामध्ये स्टीम, लोशन अशा प्रकारची थेरेपी दिली जाते.

धूम्रपान सोडण्यास सक्षम

जर तुम्हाला सिगारेटचे देखील व्यसन असेल तर त्यावर देखील ही थेरेपी काम करते. यामध्ये सिगारेटप्रमाणे निकोटीनचा कमी वापर केलेल्या सिगारेट दिल्या जातात. त्यामुळे तलब झाल्यास तुम्ही ही थेरेपी घेऊ शकता. त्याने तुम्हाला धूम्रपान सोडण्यास मदत होईल.

निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीचा वापर जगभरात यशस्वीपणे केला जात आहे. अमेरिका आणि अनेक युरोपीय देशांना NRT चा वापर करून यश मिळाले आहे. भारतात देखील या थेरेपीने व्यक्ती स्वत:ला व्यसनातून मुक्त करू शकतात.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT