World Health Day canva
लाईफस्टाईल

World Health Day 2024: ७ एप्रिलला 'जागतिक आरोग्य दिन' का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

World Health Day 2024: दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस 'जागतिक आरोग्य दिन' म्हणून साजरा केला जातो. 'माय हेल्थ, माय राइट्स' या थीमवर यंदाचा जागतिक आरोग्य दिनैचे सेलिब्रेशन होणार आहे. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात नेमकं का झाली हे जाणून घेऊया.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

World Health Day 2024: आपलं आरोग्य हिचं आपली संपत्ती हे आपण बऱ्याच वेळा ऐकतो. पण जेव्हा आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची वेळ येते तेव्हा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं.यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून 'जागतिक आरोग्य दिन'साजरा केला जातो.दरवर्षी जागतिक आरोग्य दिन हा ७ एप्रिलला साजरा करतात.या दिवशी लोकांना त्यांच्या आरोग्या संबंधित समस्या आणि अधिकारांबद्दल माहिती दिली जाते. प्रत्येकवर्षी वेगनेगळ्या थीमवर हा दिवस साजरा केला जातो.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावर्षी 'हेल्थ माय राइट्स'या थीमवर हा दिवस साजरा केला जाणार आहे. या दिवशी सर्वत्र उत्तम आरोग्य सेवा आणि त्याबद्दल माहिती दिली जाईल . माहितीनुसार, जगभरात आजही अनेक ठिकाणी पुरेशी आरोग्य सेवा अद्यापही उपलब्ध नाही. अशा परिसरात आरोग्याबद्दल जनजागृती करणे आणि पुरेश्या आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काम करत आहे.

कधी झाली जागतिक आरोग्य दिन साजरा करण्याची सुरुवात?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना ७ एप्रिल १९५० मध्ये झाली. त्या दिवसापासून दरवर्षी या दिवशी 'जागतिक आरोग्य दिन' साजरा केला जातो. जगातील अनेक देशांमध्ये आरोग्याबद्दल जागरुकता पसरवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आरोग्य फक्त शारीरिक नाही तर मानसिक दृष्टिने सुद्दा निरोगी राहिलं पाहिजे.

जागतिक आरोग्य दिन का साजरा करतात?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची १९४८ मध्ये पहिली जागतीक पातळीवर आरोग्य सभा झाली. या सभेत जागतिक आरोग्य दिन साजरा केला पाहिजे अशी मागणी करण्यात आली. आरोग्या विषयी जनजागृतता करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून जागतिक स्थरावर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. 'माय

हेल्थ माय राइट हा थम करण्याचा उद्देश म्हणजे लोकांना शुद्ध पाणी, आवश्यक पोषण राहण्यासाठी चांगले घर हा प्रत्येकाचा हक्क आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी

Shocking: भुकेनं व्याकुळ मुलानं दूध मागितलं, संतापलेल्या बापानं ४ वर्षाच्या पोराला दरवाजावर आपटलं

राज्यातील 80 लाख महिला अपात्र! ₹1500 सरकारच्या डोळ्यात खुपताय का?

पोटावरची चरबी झटक्यात उतरेल! सकाळी दुधासोबत प्या 'या' हिरव्या पानांची पावडर

Satbara Utara : कामाची बातमी! ५ मिनिटात घरबसल्या काढा सातबारा, फक्त ₹१५ होणार खर्च; पाहा 7/12 ऑनलाइन काढण्याची सोपी प्रोसेस

SCROLL FOR NEXT