World Day Against Child Labour Saam Tv
लाईफस्टाईल

World Day Against Child Labour : बालमजुरी रोखण्यासाठी संविधानात तरतूद, जाणून घ्या सविस्तर

Child Labour : दरवर्षी १२ जून रोजी ही जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस साजरा केला जातो.

कोमल दामुद्रे

Child Labour In India : दरवर्षी १२ जून रोजी ही जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश देशाभरात बालमजुरीमध्ये गुंतलेल्या मुलांच्या शोषणाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा आहे.

बालमजुरीविरुद्धच्या जागतिक दिनापूर्वीच्या एका अहवालात म्हटले आहे की, जगभरात (World) बालमजुरी करणाऱ्या मुलांची संख्या 160 दशलक्ष झाली आहे. गेल्या चार वर्षांत ८.४ दशलक्ष मुलांची वाढ झाली आहे. हा दिवस जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये साजरा (Celebrate) केला जातो. यंदा 'बालमजुरी समाप्त करण्यासाठी सार्वत्रिक सामाजिक संरक्षण' अशी थीम ठेवण्यात आली आहे. जाणून घेऊया बालमजुरी थांबवण्यासाठी काय आहेत कायदे (Law)

1. बाल कामगार अधिनियम 1986 नुसार, देशातील बालकामगारांसाठी सरकारने कायदा काढला आहे. त्यानुसार 14 वर्षांखालील मुलं कोणत्याही ठिकाणी काम करताना आढळली तर त्या व्यक्तीच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल.

2. २०२० साली बाल न्याय कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती लहान मुलांना काम करण्यास जबरदस्ती करत असेल तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.

3. २००९ मध्ये बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा बनवण्यास आला आहे. या कायद्यानुसार ६ ते १४ वर्षांच्या मुलांसाठी योग्य आणि सक्तीचे शिक्षण घेण्याचा हक्क देण्यात आला आहे. तसेच 14 वर्षापर्यंत मुलांना सरकारकडून मोफत शिक्षण देण्यात येते.

या कायद्यानुसार मुलांना शिकवणे अंत्यत गरजेचे आहे त्यामुळे देशभरात बालमजुरी थांबवता येईल व मुलांचे उज्जवल भविष्य बनवता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस कधी येणार? आता एका QR कोडवर मिळणार सगळी माहिती; 17 वर्षीय साईश्रद्धाची भन्नाट कल्पना, परिवहन मंत्र्यांनी थेट नोकरीवर घेतले

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

घराच्या प्रवेशद्वारावर 'या' तीन गोष्टी ठेवल्यानं दूर होईल आर्थिक चणचण; घरात येईल समुद्धी

Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT