World brain day ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

World Brain Day: ब्रेन स्ट्रोकची लक्षणे व धोक्याविषयी जाणून घ्या

जगभरात असंख्य लोक हे मेंदूच्या अनेक समस्य़ांशी लढत आहे.

कोमल दामुद्रे

मुंबई : जगभरात २२ जुलै हा दिवस जागतिक ब्रेन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. मेंदूच्या आरोग्याविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यात यावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

हे देखील पहा -

जगभरात (World) असंख्य लोक हे मेंदूच्या अनेक समस्य़ांशी लढत आहे. त्यात सध्या भारतात याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. सध्या केलेल्या एका सर्वेनुसार असे लक्षात आले की, ७८ टक्के लोकांना ब्रेन स्टोक कसा होतो व त्याच्यात कोणत्या प्रकारचे धोके निर्माण होतात याविषयी त्यांना माहित नाही. ब्रेन स्टोक हा आजार अधिक घातक आहे. या आजारात जीव देखील गमवावा लागू शकतो. हा दिवस पहिल्यांदा २०१४ साली साजरा करण्यात आला. या वर्षीच्या मोहिमेचा एक भाग म्हणून, WFN आणि MSIF या दोन संस्थांनी MS असलेल्यांना, त्यांच्या कुटुंबातील(Family) सदस्यांना आणि आरोग्य तज्ज्ञांना आणि जनतेला याबद्दल जागरुकता निर्माण करण्याचे आवाहन केले आहे.

७८ टक्के लोकांना ब्रेन स्टोकच्या लक्षणे व धोक्याविषयी माहित नाही -

इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, ब्रेन स्ट्रोकबाबत जनजागृती करण्यासाठी भारतातील १२ शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात फक्त २२ टक्के लोकांना ब्रेन स्ट्रोकच्या विषयी माहित आहे, तर ऊर्वरित ७८ टक्के लोकांना याची माहिती अद्यापह नाही. त्यातील १० टक्के लोकांना त्याचा उपचार कसा होतो याविषयी माहित आहे. तर ९० टक्के लोकांना याच्या उपचाराविषयी माहित नाही.

सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, भारतातील लहान शहरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना या आजाराविषयी कमी माहिती आहे. तर भारतातील काही राज्यात सुमारे ३० टक्के लोकांना हा शब्द माहित होता. २०१९ मधील लॅन्सेट ग्लोबल हेल्थ अहवालात असे आढळून आले, ब्रेन स्ट्रोकची लक्षणे ही पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक आहे. भारतात ब्रेन स्ट्रोकच्या आजारात सातत्याने वाढ होत आहे. याबाबत जनजागृती करण्याची अंत्यत गरज आहे.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Historical Places : प्रेमाचे अद्वितीय प्रतीक! जोडीदारासोबत आयुष्यात एकदा तरी 'हे' ठिकाण फिराच

बारामती पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट! 'बिग बॉस' फेम बिचुकले मैदानात; थेट सुनेत्रा पवारांना देणार आव्हान

Maharashtra Live News Update : मध्य प्रदेशमध्ये इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

Accident : २२ प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, ४ जणांचा मृत्यू

Face Care: उन्हाळ्यात चेहऱ्याला थंडावा देण्यासाठी आठवड्यातून २ वेळा लावा 'हा' खास फेसपॅक

SCROLL FOR NEXT