World Aids Day : आज जगभरात जागतिक एड्स दिन साजरा केला जात आहे. या दिवसाची सुरुवात 1988 पासून सुरु झाली असून दरवर्षी 1 डिसेंबर रोजी या दिवसाची जनजागृती केली जाते.
हा दिवस आंतरराष्ट्रीय दिवस असून एचआयव्ही संसर्गाच्या प्रसारामुळे झालेल्या एड्सच्या साथीच्या आजाराविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि या आजाराने मृत्यू झालेल्या लोकांसाठी शोक व्यक्त करण्यासाठी समर्पित आहे.
सन 2020 पर्यंत, या आजाराने (Disease) सुमारे 36.3 दशलक्ष लोकांचा बळी घेतला आहे आणि सुमारे 37.7 दशलक्ष लोक अजूनही HIV ने ग्रस्त आहेत.
एड्स म्हणजेच ऍक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम, हा एक जुनाट आणि जीवघेणा रोग आहे जो एचआयव्ही म्हणजेच मानवी इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसमुळे पसरतो. जे टाळणे अंत्यत आवश्यक आहे. वेळीच आपण काही गोष्टींची काळजी घेतली नाहीतर आपल्याला देखील त्याचे संक्रमण होऊ शकतो. जाणून घेऊया हा आजार कसा जडतो.
जोडीदाराला (Partner) HIV चा संसर्ग झाला असल्यास जोडीदारासोबत योनिमार्ग, गुदद्वारासंबंधी किंवा तोंडावाटे शारीरिक संबंध असल्यास एचआयव्ही तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतो. म्हणूनच केवळ एकाच जोडीदारासोबत सेक्स करणे महत्त्वाचे आहे, अनोळखी व्यक्तींसोबत असे संबंध ठेवणे धोकादायक ठरु शकते.
एचआयव्ही रुग्नाला दिलेले इंजेक्शन्स शेअर केल्याने तुम्हाला HIV आणि इतर संसर्गजन्य रोगांचा धोका होतो. म्हणूनच तुम्ही तुमच्या शरीरात इंजेक्शनसाठी अशी सिरिंज किंवा सुई कधीही वापरू नका जी दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरली गेली असेल.
बरेचदा रक्त चढवताना हे एचआयव्हीने संक्रमित असलेल्या व्यक्तीचे वापरु नये. यामुळे तुम्हाला देखील हा संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच रक्तदान आणि रक्त संक्रमणापूर्वी हे रक्त एचआयव्ही बाधित आहे की नाही हे तपासले पाहिजे.
संसर्ग झालेल्या माता गर्भधारणेदरम्यान किंवा प्रसूतीदरम्यान किंवा स्तनपानाद्वारे त्यांच्या बाळाला विषाणू पसरवू शकतात. ज्या माता एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत आणि गर्भधारणेदरम्यान संसर्गावर उपचार घेतात त्या त्यांच्या बाळाला होणारा धोका लक्षणीयरीत्या कमी करू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.