Women's Equality Day : दरवर्षी 26 ऑगस्ट हा महिला समानता दिवस म्हणून साजरा केला जातो. महिलांना सन्मान, समान अधिकार आणि त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
वडिलांच्या मालमत्तेत मुलीचा हक्क नसणे, महिलांना नोकरीत समान पद आणि पगार न मिळणे, अशा अनेक बाबतीत महिलांची स्थिती अत्यंत चिंताजनक होती, तरीही महिलांनी त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला आणि अनेक क्षेत्रात समान हक्क मिळवून दिले.
सध्या अशा अनेक दिग्गज महिला (Women) आहेत, ज्या आपापल्या क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी करत आहेत. क्रीडा जगतापासून राजकारण आणि राष्ट्रीय सुरक्षा तसेच प्रशासकीय क्षेत्रापर्यंत काही महिलांची भूमिका अतिशय भक्कम आहे. इतर महिलांसाठी महिला शक्तीचे उदाहरण बनल्या आहेत. महिला समानता दिनानिमित्त सशक्त महिलांबद्दल जाणून घेऊया.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
राष्ट्रपती हे भारताचे सर्वोच्च पद आहे. सध्या देशातील सर्वोच्च पद महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आहे. द्रौपदी मुर्मू महिला समानतेचे सर्वात मोठे उदाहरण ठरले आहे. त्या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. द्रौपदी मुर्मूने तीन मुलांच्या मृत्यूनंतर पती गमावल्यानंतरही परिस्थितीसमोर हार मानली नाही.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन
सध्या देशातील सर्वात शक्तिशाली महिला राजकारण्यांमध्ये निर्मला सीतारामन यांचे नाव पहिले जाते. निर्मला सीतारामन या भारत (India) सरकारच्या अर्थमंत्री आहेत. एनडीए सरकारच्या पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आधी संरक्षण मंत्रीही होत्या.
अभियंता आणि सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती
सुधा मूर्ती या भारतातील सर्वात मोठ्या वाहन उत्पादक अभियांत्रिकी आणि लोकोमोटिव्ह कंपनी (Company) Telco मध्ये काम करणाऱ्या पहिल्या महिला अभियंता आहेत. याशिवाय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवणाऱ्या 150 विद्यार्थ्यांमध्ये सुधा या पहिल्या महिला होत्या. त्यांनी हुबळीच्या BVB कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये प्रथम श्रेणीत पदवी प्राप्त केली. इन्फोसिस फाऊंडेशनचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी आहेत. तिने आतापर्यंत 8 कादंबर्या लिहिल्या असून त्या प्रसिद्ध समाजसेविका म्हणून कार्यरत आहेत.
फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंग
देशाच्या संरक्षण विभागात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचा सहभाग वाढला आहे. अनेक मुली सैन्यात उच्च पदावर आहेत. यापैकी एक म्हणजे फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंग, जी भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामील झालेल्या राफेल हे शक्तिशाली लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक आहे. याआधी तिने मिग 21 देखील उडवले आहे.
मेरी कोम
मेरी कोमने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय (International) स्तरावर एक मजबूत स्थान निर्माण केले जे पूर्वी पुरुषांपुरते मर्यादित होते. अॅथलीट मेरी कोम मांगटेने तिच्या कठोर परिश्रम आणि कठोर प्रशिक्षणाच्या बळावर बॉक्सिंगमध्ये सहा महिला जागतिक विजेतेपद पटकावले आहे. 2012 साली ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक, 2014 साली आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या मेरी कोमला अर्जुन पुरस्कार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.