Issues During Menopause saam tv
लाईफस्टाईल

Menopause symptoms : ८०% महिलांना पिरीयड्स जाण्याच्या काळात होतात ‘हे’ त्रास; तज्ज्ञांनी दिल्या सोप्या टीप्स

Issues During Menopause : रजोनिवृत्तीच्या लक्षणांमुळे नोकरीवरील आयुष्य आव्हानात्मक बनू शकते. सर्वेक्षणानुसार नोकरी करणाऱ्या स्त्रियांपैकी ८० टक्‍के स्त्रियांना एकाग्रता साधणे कठीण जातं, ७३ टक्‍के स्त्रियाना वारंवार रजा घ्यावी लागते आणि ६६ टक्‍के स्त्रियांना मनोवस्थेत मोठे चढउतार जाणवतात

Surabhi Jayashree Jagdish

भारतामध्ये, स्त्रिया वयाच्या सुमारे ४६ वर्षाच्या आसपास मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्तीच्या टप्प्यातून जातात. पाश्चात्य देशांतील ५१ वर्षांच्या सरासरी वयाच्या तुलनेत भारतीय स्त्रियांमध्ये हा टप्पा लवकर येतो. या काळामध्ये स्त्रियांनी काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यातील संतुलन साधतानाच रजोनिवृत्तीची लक्षणं समजून घेणं आणि त्यांना हाताळणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

अबॉट आणि इप्सोस यांनी घेतलेल्या एका सर्वेक्षणामध्ये रजोनिवृत्तीचा स्त्रीच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत असल्याचे मत ८७ टक्‍के लोकांनी व्यक्त केले. हॉट फ्लशेसमध्ये महिलेला घामाघूम होणे, मूड्स बदलत राहणं आणि झोप न लागणं अशी लक्षणं दिसून येतात. तरीही या प्रश्नाविषयी कुटुंबीयांशी, मित्रमंडळींशी, सहकाऱ्यांशी बोलणं अवघड वाटत असल्याचे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या जवळ-जवळ ८० टक्‍के महिलांनी सांगितलं.

सर्व्हेक्षणातून काय आलं समोर?

या सर्वेक्षणामध्ये सात शहरांतील १२०० हून अधिक लोकांचे विचार नोंदवून घेण्यात आले. या विषयाबद्दल स्त्रियांमध्ये कितपत जागरुकता आहे, त्याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे व रजोनिवृत्तीदरम्यान त्या कोणत्या अनुभवांतून जातात याचा अंदाज घेणे हा या सर्वेक्षणाचा हेतू होता. या सर्वेक्षणामध्ये ४५-५५ वर्षे वयोगटातील स्त्रिया तसंच कुटुंबातील सदस्यांचा समावेश होता.

अबॉट इंडियाच्या मेडिकल अफेअर्स हेड डॉ. रोहिता शेट्टी सांगतात, “रजोनिवृत्तीविषयी जागरुकता वाढवण्याचं काम हे केवळ काही तथ्यांची माहिती करून देण्यापुरते मर्यादित नसते. इथे स्त्रियांना आपला अनुभव सांगताना अवघडलेपणा वाटणार नाही असा एक अवकाश त्यांच्यासाठी निर्माण करणे गरजेचे असते. विमेन फर्स्ट ही वेबसाइट हा असाच एक मंच आहे, जो उपयुक्त माहिती पुरवतो व कुटुंबीय, मित्रपरिवार व सहकाऱ्यांशी खुल्या, अर्थपूर्ण संवादाला प्रोत्साहन देतो. या आधारामुळे स्त्रिया आपल्या आयुष्यातील पुढचा टप्पा आत्मविश्वासाने व सहजतेने स्वीकारण्यास सक्षम बनतात.”

शिंदे मेडिकेअर हॉस्पिटल, मुंबईच्या संचालक डॉ. वीणा शिंदे यांच्या मते, “रजोनिवृत्ती हा प्रत्येक स्त्रीसाठी एक आगळावेगळा अनुभव असतो, ज्याचा परिणाम तिच्या आरोग्यावर, स्वास्थ्यावर आणि एकूणच जीवनमानाच्या दर्जावर होतो. सर्वसमावेशक दृष्टीकोनामुळे बदलाचा हा टप्पा सुलभतेने आणि अधिक आरामदायीपणे पार करता येऊ शकतो. नोकरदार महिलांसाठी ध्यानधारणेसाठी छोटासा ब्रेक घेण, कितीही व्यस्त दिनक्रम असला तरीही संतुलित आहार घेणं आणि नियमित व्यायामासाठी आवर्जून वेळ काढणं अत्यावश्यक आहे.

रजोनिवृत्तीची लक्षणं अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी व आपल्या आरोग्याची तसंच आपल्या करिअरची सूत्रे आपल्या हातात घेण्यासाठी काही टिप्स पुढीलप्रमाणे-

बोलत्या व्हा आणि गरज असेल तेव्हा मदत मागा

आपल्या लक्षणांविषयी व त्यांचा तुमच्या कामावर कसा परिणाम होत आहे याविषयी आपल्या सहकाऱ्यांशी आणि सुपरवायझर्सशी बोला. तुम्ही कोणत्या स्थितीतून जात आहात याबद्दल मित्रमंडळींशी आणि कुटुंबाशी – किंवा आपल्या विश्वासू सहकाऱ्यांशीही चर्चा केल्याने तुम्हाला त्यांचे पाठबळ मिळू शकेल तसेच तुमची स्थिती जाणणाऱ्या व्यक्तींचे एक नेटवर्क तयार होऊ शकेल. कदाचित इतर कुणी अशाच प्रकारच्या अनुभवातून गेलेले असेल आणि त्यांनी हे प्रश्न कशाप्रकारे हाताळले हे तुम्हाला त्यांच्याकडून कळू शकेल.

कामाच्या ठिकाणी आधार देणारे वातावरण तयार करा

कामाच्या ठिकाणी थोडेसे फेरफार केले तर लक्षणे हाताळणे तुलनेने सोपे जाऊ शकते. जसे की हॉट फ्लशेस किंवा अस्वस्थतेसाठी डेस्क फॅन जवळ बाळगणे किंवा कामाचे वेळापत्रक थोडे लवचिक बनविण्यासारख्या साध्यासोप्या गोष्टी उपयुक्त ठरू शकतात.

स्वत:ची काळजी घेण्यास प्राधान्य द्या

आपल्या कामाच्या वेळापत्रकामध्ये मनावरचा ताण कमी करणाऱ्या काही गोष्टींची भर टाका. मूड स्विंग्ज आणि थकवा हाताळण्यासाठी माइंडफुलनेस आणि शरीरावरचा ताण घालवणाऱ्या रिलॅक्सेशनच्या तंत्रांचा सराव करा व थोडा हलकाफुलका व्यायाम करा.

वैद्यकीय मदत घ्या

आपल्या लक्षणांविषयी एखाद्या स्त्रीरोगतज्ज्ञाशी बोला व उपचारांचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत याचा शोध घ्या. जीवनशैलीतील बदल आणि योग्य औषधोपचारांच्या मदतीने रजोनिवृत्तीच्या काळातील लक्षणे प्रभावीपणे हाताळता येऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्का लागल्याने सटकली; रागाच्या भरात हॉटेलबाहेर धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, डोंबिवलीत खळबळ

फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणी काँग्रेस आक्रमक; उद्या वर्षा बंगल्याला घेरावाचा इशारा|VIDEO

Maharashtra Live News Update : मनोज जरांगेंवर कारवाईची मागणी; धनंजय मुंडेंना ओबीसी कार्यकर्त्यांचा दुग्धाभिषेकाने समर्थन

Couple Kiss in Car : कारमध्ये गर्लफ्रेंडला किस करणं गुन्हा आहे का?

शिरूरमध्ये बिबट्याची दहशत, जीव वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी लढवली अनोखी शक्कल|VIDEO

SCROLL FOR NEXT