Winter Skin Care Saam Tv
लाईफस्टाईल

Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचा निस्तेज होतेय? हा घरगुती फेसपॅक ट्राय करा, दिसाल अधिक सुंदर

कोमल दामुद्रे

Skin Care Tips :

प्रत्येकाला असे वाटते की, आपण अधिक सुंदर दिसायला हवे. त्यामुळे ते त्वचेसाठी अधिक गोष्टींचा वापर करतात. आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये आपण अनेक गोष्टींचा समावेश करतो.

राज्यातील काही भागात थंडी जाणवू लागली आहे. थंडीचा सगळ्यात जास्त परिणाम होतो तो त्वचेवर. या काळात त्वचा अधिक कोरडी पडते. दिवसभर कामात व्यस्त असल्यामुळे रात्रीच्या वेळी ही त्वचा अधिक त्रास देऊ लागते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिवसभर आपण बाहेर असल्यामुळे प्रदूषित वातावरण आणि बदलेली जीवनशैली यामुळे त्वचेची नैसर्गिक चमक कमी होते. त्वचेला (Skin) ग्लो येण्यासाठी आपण अनेक रासायनिक उत्पादनांचा वापर करताता. परंतु, आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय (Home remedies) सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने त्वचेचे आरोग्य सुधारु शकते. हिवाळ्यात (Winter Season) त्वचेला सतत मॉइश्चयरायजर ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्हालाही त्वचेला हायड्रेट आणि ग्लोइंग बनवायचे असेल तर स्किन केअर रुटीनमध्ये हा फेसपॅक ट्राय करुन पाहा

1. कोरफड जेल आणि बटाटा

कोरफड जेल आणि बटाटा हा त्वचेसाठी फायदेशीर मानला जातो. बटाटाच्या कापावर कोरफड जेल लावून त्वचेवर चोळा. ज्यामुळे चेहऱ्यावरील घाण आणि डेड स्किन निघण्यास मदत होईल.

2. मुलतानी माती

तुमची त्वचा अधिक तेलकट आहे. चेहऱ्यावर सतत पिंपल्स येताय तर तुम्ही मुलतानी मातीचा फेस पॅक ट्राय करु शकता. आठवड्याभरात नियमितपणे मुलतानी माती लावल्यास त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होईल. यामध्ये गुलाब जल मिक्स करु शकता. ज्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होऊ शकतात. तसेच यामुळे चेहऱ्यावरील पीएच लेवल बॅलेंस करण्यास मदत होते. हा पॅक ड्राय स्किन असणाऱ्यांनी लावू नये.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

SCROLL FOR NEXT