High Blood Pressure Saam Tv
लाईफस्टाईल

कडाक्याच्या थंडीत वाढू शकतो High Blood Pressure, या टिप्स लक्षात ठेवाच!

How To Control High Blood Pressure : तापमानात घट झाल्यामुळे आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांमुळे असे घडते. शरीराचे तापमान राखण्यासाठी हृदयातील धमन्या आकुंचन पावतात ज्याला व्हॅसोकॉन्स्ट्रक्शन म्हणतात. त्यामुळे रक्ताभिसरणाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

कोमल दामुद्रे

Winter Care Tips :

हिवाळा सुरु झाला की, अनेक आजार उद्भवतात. वातावरणातील बदलामुळे आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. या ऋतूमध्ये मधुमेह आणि रक्तदाबाच्या रुग्णांना स्वत:ची विशेष काळजी घ्यावी लागते.

तापमानात घट झाल्यामुळे आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांमुळे असे घडते. शरीराचे तापमान राखण्यासाठी हृदयातील धमन्या आकुंचन पावतात ज्याला व्हॅसोकॉन्स्ट्रक्शन म्हणतात. त्यामुळे रक्ताभिसरणाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

रक्तवाहिन्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. ज्यामुळे काही वेळा रक्तदाब चढ-उतार होण्याची शक्यता असते. BP मध्ये अचानक चढउतार होतो हृदयासाठी खूप हानिकारक असू शकते. हृदयविकाराचा झटका (Heart attack) आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. त्यामुळे हिवाळ्यात तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी काय काळजी (Care) घ्यायला हवी. जाणून घेऊया

1. स्वत:ला उबदार ठेवा

कडाक्याच्या थंडीत रक्तदाब वाढू शकतो म्हणून स्वत:ला उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा. हिवाळ्यात उबदार कपडे घाला ज्यामुळे शरीराला उब मिळेल आणि रक्ताभिसरण चांगले राहिल.

2. मीठाचे सेवन कमी

जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब होऊ शकतो. हिवाळ्यात बीपी वाढण्याचा धोका जास्त असतो. ज्यामुळे ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे जेवणात मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवा.

3. भरपूर पाणी प्या

हिवाळ्यात आपण कमी प्रमाणात पाणी पितो. ज्यामुळे आपल्याला डिहायड्रेशनची समस्या होते. पाण्याच्या कमतरतेमुळेही रक्तदाबात चढ-उतार होऊ शकतो. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका.

4. व्यायाम करा

व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते. तसेच आपले आरोग्यही चांगले राहाते. त्यासाठी रोज व्यायाम करा. ज्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहिल. यासाठी तुम्ही दररोज काही तास चाला, स्ट्रेचिंग किंवा एरोबिक व्यायाम करा

5. आहार

सकस आहार घेतल्याने आपले संपूर्ण शरीर निरोगी राहाते. त्यासाठी ऋतूमानानुसार हंगामी भाज्या, फळे, कडधान्य, दूध इत्यादींचा आहारात समावेश करा. यामुळे कोलेस्टेरॉल वाढणार नाही. तसेच रक्तदाबही नियंत्रणात राहिल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Free Tyres: ना पंक्चर, ना हवा भरण्याची गरज! बाजारात आले Air Free टायर, वैशिष्ट्ये काय?

Nagpur Crime : पोलिसाची तलावात उडी मारून आत्महत्या, नागपूर पोलिस दलात खळबळ; धक्कादायक कारण समोर

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये भरधाव कारची ४ दुचाकींना धडक, २ जण जखमी

Viral Video: लग्नसोहळ्यात रक्तरंजित थरार! स्टेजजवळ जात तरुणाने नवरीला गोळी झाडली, थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Ro-Ro Service: मुंबई -कोकण रो-रो सेवा सर्वसामान्यांच्या बजेटबाहेर, तिकीटाचे दर पाहून डोळे फिरतील | VIDEO

SCROLL FOR NEXT