Winter Heart Care Saam Tv
लाईफस्टाईल

Winter Heart Care : हिवाळ्यात वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका? हृदयविकाराच्या झटक्यापासून कसा कराल बचाव

Heart Attack Reason : हिवाळ्यात कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराचा झटका मोठ्या प्रमाणात येतो. अशावेळी हृदयाची काळजी कशी घ्यायला हवी हे जाणून घेऊया.

कोमल दामुद्रे

Symptoms Of High Cholesterol Levels :

बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. या चुकीच्या सवयींमुळे आपल्याला हृदयविकार, मेंदूच्या समस्या, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलसारख्या आजारामुळे तरुणवर्ग चिंतेत आहे.

हिवाळा ऋतू सुरु झाला की, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक वाढते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. हृदयविकाराचा झटका येण्याचे सगळ्यात मोठे कारण नसांमध्ये जमलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल. यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. तसेच हृदयाला पुरेसा प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हिवाळ्यात (Winter Season) कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराचा झटका मोठ्या प्रमाणात येतो. अशावेळी हृदयाची काळजी (Care) कशी घ्यायला हवी हे जाणून घेऊया.

1. छातीत दुखणे

शरीरातील कोरोनरी धमन्या या अधिक नाजूक असतात. ज्यामुळे हृदयाला ऊर्जा आणि ऑक्सिजन मिळते. परंतु, हिवाळ्यात या दोन्ही गोष्टींवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. कारण रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढते ज्यामुळे हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येतो.

2. हृदयापर्यंत रक्त पोहोचत नाही

हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकुंचित होऊ लागतात. त्यामुळे शरीराच्या सर्व भागांमध्ये रक्त पोहोचण्यास अडचणी निर्माण होतात. अशावेळी उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते. या ऋतूत हृदयविकाराचा धोका वृद्धांना अधिक असतो.

3. पुरेसा सूर्यप्रकाश न मिळणे

हिवाळ्यात धुके अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला कोवळे ऊन पुरेशा प्रमाणात मिळत नाही. शरीरातील हार्मोनल असंतुलित होते. यावेळी शरीराला कॉर्टिसॉल कमी प्रमाणात सोडले जाते ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते.

4. शारीरिक हालचालींचा अभाव

हिवाळ्यात भूक अधिक प्रमाणात लागते आणि शारीरिक हालचाली कमी होतात. ज्यामुळे शरीरात चरबी साठू लागते. त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची भीती अधिक असते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : आईचा गळा दाबला, बेदम मारहाण केली; पोटच्या मुलाचं संतापजनक कृत्य। पाहा Video

अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी एकत्र का आले नाही? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून आमदाराचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

मुंबईत रात्री मोठा राडा; भाजप आमदाराकडून ड्रग्ज तस्काराला बेदम मारहाण

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे - रुपाली पाटील

Crime: शरीरसंबंध ठेवताना बायकोनं नवऱ्याचा गळा चिरला; मृतदेहाजवळच भाच्यासोबत केले अश्लील कृत्य

SCROLL FOR NEXT