Holi 2024 Colour Saam TV
लाईफस्टाईल

Holi 2024 Colour : होळीच्या दिवशी पांढरे कपडे का परिधान केले जातात? जाणून घ्या कारण

People Wear White Clothes On Holi : गाणी लावून धिंगाणा घालायला सर्वांनाच आवडते. परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की, होळीच्या दिवशी सफेद रंगाचे कपडे का घातली जातात? नसेल तर जाणून घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Holi Outfit History:

आपल्या महाराष्ट्रात अनेक सण उत्सव अगदी मोठ्या जल्लोषात साजरी केले जातात. असंच महाराष्ट्रातील प्रत्येक सण उत्सवाच्या मागे काही ना काही शास्त्रीय आणि धार्मिक कारण नक्कीच असते. अशातच येत्या 25 मार्चला सर्वांच्याच आवडीचा सण म्हणजेच होळी हा सण येत आहे. होळीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारलेला असतो.

मौज मस्ती करण्यापासून ते एकमेकांना रंगीबेरंगी रंग लावून आणि मोठमोठ्या आवाजात गाणी लावून धिंगाणा घालायला सर्वांनाच आवडते. परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की, होळीच्या दिवशी सफेद रंगाचे कपडे का घातली जातात? नसेल तर जाणून घ्या.

भारताच्या प्रत्येक भागामध्ये होळी हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. येत्या २५ मार्चला होलीका दहन आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी अनेक व्यक्ती पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून होळीचे रंगीबेरंगी रंग खेळायला बाहेर पडतील. काही ज्योतिषी असं म्हणतात की, होळीच्या दिवशी राहूदेवाचा स्वभाव अतिशय उग्र होतो.

ज्याचा थेट परिणाम माणसाच्या वागण्यावर होतो. राहू देवाचा स्वभाव उग्र असल्याकारणाने व्यक्तीचा स्वभाव चिडचिडा होऊन जातो. तो व्यक्ती समोरच्याशी उग्रपणे बोलू लागतो. त्यामुळे जर तुम्ही सफेद रंगाचे कपडे परिधान केले तर, राहू देवाचा दुष्परिणाम तुमच्यावर होणार नाही. सफेद म्हणजेच पांढरा हा रंग शांततेचा प्रतीक मानला जातो. म्हणूनच होळीच्या दिवशी पांढरे कपडे परिधान करावे.

अशातच होळी या सणाला सनातन धर्मामध्ये विशेष स्थान आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते. सोबतच उत्तर प्रदेशातील लोकांसाठी होळीसणाच्या पर्वात छठपर्वाला सगळ्यात महत्त्वाचे स्थान दिले आहे.

महाराष्ट्रात होळी हा सण राजामहाराजांपासून साजरा होत आलेला सण आहे. या दिवशी प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. एवढेच नाही तर एकमेकांमधील मतभेद आणि भांडण विसरून सगळे एकत्र गुण्यागोविंदाने हा सण साजरी करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng Lord Test : जे सचिन-विराटला जमलं नाही, ते केएल राहुलनं करुन दाखवलं, पठ्ठ्यानं लॉर्ड्सचं मैदान गाजवलं

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

SCROLL FOR NEXT