ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लेयर कट हा सर्वात लोकप्रिय हेअरकट आहे. लेयरमध्ये केस कापले जातात. या कटमुळे केसांना नैसर्गिक व्हॉल्युम मिळतो. सरळ, वेव्ही किंवा कुरळ्या केसांसाठी हा कट योग्य आहे.
सध्या कॉलेज स्टुडंट्स आणि ऑफिस वुमनसाठी हा हेअर कट खूपच ट्रेंडीग आहे. मोठ्या केसांवर हा कट अतिशय सुंदर दिसतो. स्टेप कटमध्ये केस लेयरमध्ये कापले जातात. यामुळे केस स्टायलिश दिसू लागतात.
या हेअर कटमध्ये केसांचा शेवट ‘U’ आकारात कापला जातो. लांब केस असणाऱ्या महिलांसाठी हा कट अतिशय सुंदर दिसतो.
व्ही कटमध्ये केसांचा शेवट ‘V’ आकारात ठेवला जातो. लांब व सरळ केसांवर हा कट शार्प आणि फॅशनेबल दिसतो.
बॉब कट हा शॉर्ट हेअरकट असून तो खूप युनिक दिसतो. या कटमध्ये केस कमी मेंटेन करावे लागतात. कमी वेळेत तयार होण्यासाठी हा कट खूप सोयीचा आहे.
लॉब म्हणजे लॉंग बॉब कट. हा कट खांद्यापर्यंत किंवा थोडा खाली असतो. ऑफिस, पार्टी किंवा कॅज्युअल लूकसाठी हा कट सध्या खूपच ट्रेंडी आणि सोयीस्कर झाला आहे.
या कटमध्ये पुढील केस कपाळावर पडतील अशा प्रकारे कापले जातात. यामुळे चेहऱ्याला फ्रेश लूक मिळतो.
फेदर कटमध्ये केस पिसांसारखे कापले जातात. हा कट लॉंग केसांवर उठून दिसतो. हा कट केल्यावर केस छान पध्दतीने बांधता येतात.