ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पायातील जोडवी हि विवाहित महिलांच्या सौंदर्याची ओळख मानली जाते. पायात जोडवी घातल्याने सौंदर्य अधिक खुलून दिसते. पारंपरिक ते मॉडर्न लूकपर्यंतची जोडवी आता बाजारात वेगवेगळ्या डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत.
साध्या आणि नाजूक सिल्वर जोडवी सध्या ट्रेंडमध्ये आहेत. रोजच्या वापरासाठी तसेच ऑफिस व कॅज्युअल लूकसाठी या परफेक्ट ठरतात.
ऑक्सिडाइझ्ड जोडवींना एथनिक टच असतो. सणासुदिला कुर्ती, साडी किंवा घागऱ्यावर हे डिझाईन खूप छान शोभून दिसतात.
विशेषत: हि जोडवी पार्टीसाठी तुम्ही घालू शकता. यात रंगीत खडे किंवा कुंदन स्टोन लावलेले जोडवी पायात घातल्यावर रॉयल दिसतात.
जोडवीनां लहान घुंगरू असल्यामुळे ते पायात घातल्यावर चालताना घुंगरुंचा मधुर आवाज येतो. कार्यक्रम किंवा डान्स करायचा असेल तर तुम्ही ही जोडवी घालू शकता. घुंगरू जोडवी घातल्यावर तुम्हाला पैंजण घालण्याचीसुध्दा गरज लागणार नाही.
सोन्याची झळाळी असलेले जोडवी लग्न, हळद किंवा खास समारंभांसाठी वापरले जातात. हे पायाला एलिगंट लूक देतात.
मण्यांचे आणि मोत्यांचे जोडवी हलके, ट्रेंडी आणि युनिक दिसतात. इंडो-वेस्टर्न आउटफिटसोबत तुम्ही घालू शकता.
अॅडजस्ट करता येणारी जोडवी सध्या फार डिमांडमध्ये आहेत. बहुतेक महिलांच्या पायात अॅडजस्टेबल जोडवी दिसून येतात. हि जोडवी घेतल्यास साइजची अडचण येत नाही आणि सर्वांना सहज फिट होतात.
जोडवी वापरल्यानंतर कोरड्या कपड्याने पुसून ठेवा. पाणी व परफ्यूमपासून दूर ठेवल्यास त्यांची चमक टिकून राहते.