mosquito Coil Saam TV
लाईफस्टाईल

Mosquito Coil Side Effects: मच्छर कॉईल का जीवघेणी ठरु शकते? गुदमरुन मृत्यूचा धोका

Mosquito Coil : मच्छर कॉईल जाळून झोपत असाल काळजी घेतली पाहिजे.

साम टिव्ही ब्युरो

New Delhi: मच्छर पळवून लावणाऱ्या कॉईलच्या धुराने गुदमरून एकाच कुटुंबातील सहा जणांना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिल्लीत घडली. मृतांमध्ये चार पुरुष, एक महिला आणि एक दीड वर्षाचा मुलगा आहे.

तर घरातील दोन सदस्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मच्छर पळवून लावण्यासाठी अनेकजण घरात अशी कॉईल लावत असतात. मात्रआपणही अशा चुका केल्या तर ही कॉईल अत्यंत जीवघेणी ठरु शकते.  (Latest Marathi News)

तुम्ही जर मच्छर कॉईल जाळून झोपत असाल काळजी घेतली पाहिजे. घरात मच्छर कॉईल जाळणं हे तर एक सामान्य गोष्ट झाली आहे. या मच्छर कॉईलचे धोके देखील समजून घेतले पाहिजे. जेणेकरून आपल्याला त्यामुळे होणाऱ्या संभाव्य धोक्यांचा अंदाजही येईल.

मच्छर कॉईलमध्ये डीडीटी आणि काईबन फॉस्फरसचा समावेश असतो. बंद रुमध्ये कॉईल जाळल्यास त्यातील गॅस रुममध्ये अडकून राहतो. कॉईल जळत राहिल्याने कार्बन मोनॉक्साईडचं वाढलेलं प्रमाण घातक बनतं.

कार्बन मोनॉक्साईड ऑक्सिजनची मात्रा घटवतं. हळूहळू कार्बन मोनॉक्साईड शरीरात जाऊन श्वास घ्यायला त्रास होतो आणि दम लागलो. त्यातून गुदमरुन जीव जाण्याची भीतीही निर्माण होते. एका रिपोर्टनुसार एक कॉईल 100 सिगरेट्सइतकं खतरनाक असतं.

घरातील लहान मुलांपासून मच्छर कॉईल लांबच ठेवायला हवी. इतकंच नाही तर घरात शक्यतो मच्छर कॉईल जाळणं टाळावंच असंही आवाहन जाणकारांकडून केलं जात आहे. कारण मरच्छरचा जीव घेण्याचा नादात आपणच स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देण्याची शक्यता जास्त असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Pakistan : पाकिस्तानची पुन्हा फटफजिती! आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाचा नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार

10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; महत्वाच्या शहरातील पोलीस आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

Rishi Panchami Bhaji : ऋषी पंचमीच्या दिवशी 'या' २१ भाज्यांचा दाखवा नैवेद्य , वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT