प्रोस्टेट कॅन्सरबद्दलची जागरूकता विविध समाज माध्यम आणि प्रसारमाध्यमांमुळे वाढली असल्याने पुरुषांमध्ये पीएसए चाचणीबाबत जनजागृती वाढतेय. त्यामुळे प्रोस्टेट कॅन्सरचं वेळीच निदान होण्यास मदत होतं. बहुतेक निदान केंद्रांनी त्यांच्या आरोग्य तपासणी पँकेजसमध्ये पीएसएचा समावेश केला आहे.
पुण्यातील एशिएन इन्स्टिटयूट ऑफ मेन्स हेल्थ आणि युरोलॉजी क्लिनिकचे सल्लागार युरो आँन्कोलॉजीस्ट आणि रोबोटीक शल्यचिकित्सक व संचालक डॉ. राजेंद्र शिंपी यांनी सांगितलं की, भारतात बीआरसीए-१ आणि बीआरसीए २ सारख्या अनुवांशिक चाचण्या उपलब्ध आहेत. ज्या प्रोस्टेट कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असलेल्या व्यक्तींमध्ये अनुवांशिक कारणांमुळे होणाऱ्या कॅन्सरची शक्यता दर्शवतात.
चुकीची जीवनशैली, आहारात प्रक्रिया केलेले पदार्थ, अर्धवट शिजवलेले मांस, धूम्रपान, अल्कोहोल आणि बैठी जीवनशैली प्रोस्टेटच्या वाढीस कारणीभूत ठरू शकते.
औद्योगिक प्रदुषण, पर्यावरणातील विषारी पदार्थ, कीटकनाशक आणि जड धातू कर्करोगास कारणीभूत ठरतात.
विशेषतः तरुण पुरुषांमध्ये सीएपीचा धोका वाढला आहे.
असं दिसून आलं आहे की, तरुण पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन कमी होतं ज्यामुळे प्रोस्टेट कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतं.
वयाच्या पन्नाशीनंतर प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढतो आणि बहुतेक कॅन्सर ६५ वर्षांच्या वयानंतर आढळतात. परंतु अलिकडच्या काळात तरुण रुग्णांमध्ये याचं प्रमाण वाढतंय. यासाठी लोकांमध्ये जागरूकता वाढवणं गरजेचं आहे कारण जर कर्करोगाचे वेळीच निदान झाले रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो, असं डॉ. शिंपी म्हणालेत.
क्रॉनिक प्रोस्टेटायटीस हा प्रोस्टेट कर्करोगास कारणीभूत घटक आहे. प्रोस्टेटमधील सूज शुक्राणूंची गतिशीलता आणि शुक्राणूंच्या आकारावर परिणाम करते. ज्यामुळे वंध्यत्वाची समस्या येऊ शकते. एकदा कर्करोग झाला की शस्त्रक्रिया, रेडिएशन उपचार आणि औषधांचा समावेश असलेल्या उपचारांमुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो तसेच इरेक्टाइल डिसफंक्शनची देखील समस्या होऊ शकते. प्रोस्टेट कर्करोगाच्या उपचारांमुळे टेस्टोस्टेरॉन कमी झाल्यामुळे वंध्यत्व आणि नपुंसकता देखील होऊ शकते. प्रॉस्टेट कॅन्सरवरील उपचार प्रक्रीयेच्या रुग्णाची प्रजननक्षमता सुधारण्यास मदत करू शकतात.
स्पर्म बँकिंग – प्रोस्टेट कर्करोगाचा उपचार सुरू करण्यापूर्वी, जर रुग्ण त्याचे शुक्राणू स्पर्म बँकेत जमा करतील, तर हे शुक्राणू आयव्हीएफसाठी वापरले जाऊ शकतात.
टेस्टिक्युलर टिश्यू किंवा फलित भ्रूण जतन केले जाऊ शकतात जे पालकत्वासाठी वापरण्यात येणाऱ्या कृत्रिम पद्धतींसाठी वापरले जाऊ शकतात.
नपुंसकतेसाठी – मज्जातंतू जतन करण्याची शस्त्रक्रिया केली जाऊ शकते – सुमारे ५०% रुग्णांना त्यांची प्रजनन क्षमता परत मिळू शकते.
रेडिएशनच्या उपचाराचीस नवीन तंत्रांमुळे काही टक्के रुग्णांमध्ये प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.