Makar Sankranti 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

Makar Sankranti 2023 : मकर सक्रांतीला पतंग का उडवली जाते ? श्री रामाने सुरु केला होता हा उत्सव, जाणून घ्या त्याबद्दल

मकर संक्रांतीच्या दिवसाला आपल्या देशामध्ये विशेष स्थान आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Makar Sankranti 2023 : 2023 या वर्षातिल पहिला सण म्हणजे मकरसंक्रांती. मकर संक्रांतीच्या दिवसाला आपल्या देशामध्ये विशेष स्थान आहे. त्याचबरोबर नवीन वर्षातिल ह्या सणाच स्वागत अगदी जल्लोषाने केलं जाणार आहे.

संपूर्ण आभाळात आकाशकंदीलाची चादर पसरली पाहायला मिळते. अशातच मकर सक्रांतीच्या दिवशी घराघरांमध्ये वेगवेगळया प्रकारचे व्यंजन बनवले जातात. त्याचबरोबर आकाशात पतंग उडवतात. खूप पूर्वीच्या काळापासून संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवणे हे शुभ मानले जाते.

तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला असं बोलून जगभरात (World) मकरसक्रांती हा सण ( Festival)अगदी धुमधाममध्ये साजरी केला जाईल. या वर्षी 15 जानेवारीला संक्रांती येत आहे. सगळ्यांच्या घरी तिळगुळाचे लाडू, विविध प्रकारच्या मिठायी, दही वडे, खिचडी, मुरमुऱ्याचे लाडू अशा पद्धतीची विविध व्यंजने बनवली जातील.

मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ, खिचडी या सर्व पदार्थांना विशेष स्थान आहे आणि ही पकवान करणे अतिशय शुभ मानले जाते. त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवसाचा सर्वात आवडता खेळ म्हणजे पतंग उडवणे. कोण कोणाची पतंग कापतयं याकडे सगळ्यांचं लक्ष असत. या खेळाला आपल्या भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. पतंग उडवणे ही एक धार्मिक परंपरा मानली जाते.

जून्या काळातील मान्यतेनुसार पतंग उडवणे ही परंपरा भगवान श्री राम यांनी सुरु केली होती. भगवान श्री राम यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवली होती आणि ही पतंग इंद्रलोकांपर्यंत पोहोचली होती.

म्हणूनच हिंदू संस्कृतीमध्ये पतंग उडवणे याला शुभ खेळाचा दर्जा दिला आहे. त्याचबरोबर पतंग उडवण्याचा एक महत्वाचा आणि प्रेरणा देणारा संदेश सांगितला जातो. तो म्हणजे पतंग अगदी स्वतंत्रपणे आकाशात भरारी घेत जातो. त्याच्यासारखंच प्रतेकाने आपल्या आऊष्यात कायम उंच झेप घेऊन पुढे जात रहावं. असा गोड संदेश पतंग उडवताना सांगितला जातो.

अशातच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार केला तर पतंग उडवणे हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. आपण बाहेर जाऊन जेव्हा पतंग उडवतो तेव्हा सूर्याची सोनेरी किरणे आपल्या अंगावर पडतात आणि त्यामुळे आपल्यातील विविध रोग नाहीसे होऊन आपल्याला एक सदृढ आयुष्य देतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

Monday Horoscope : शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाची कृपा होणार; ३ राशींचं नशीब फळफळणार

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

SCROLL FOR NEXT