How tobacco increases oral cancer risk saam tv
लाईफस्टाईल

Early cancer symptoms: तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्येच का होतं कॅन्सरचं निदान? डॉक्टरांनी सांगितलं यामागचं कारण

How tobacco increases oral cancer risk: तोंडातील न भरून येणारी जखम, वेदना किंवा गिळताना त्रास ही तोंडाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. तंबाखूपासून दूर राहा, नियमित स्क्रीनिंग करा आणि वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेऊन कॅन्सरचा धोका कमी करा.

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सर हा आजच्या काळातील सर्वात गंभीर आजारांपैकी एक मानला जातो. जगभरात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढत असून भारतातही तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढलेलं पाहायला मिळतंय. वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती झाली असली तरी अनेक रुग्णांना कॅन्सरचं निदान तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यातच होतं. त्यामुळे उपचार कठीण होतात आणि बरे होण्याची शक्यता कमी होते.

डॉक्टरांच्या मते, यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे सुरुवातीच्या लक्षणांकडे होणारं दुर्लक्ष. तोंडात छोटा घाव, वारंवार होणाऱ्या जखमा, जखम भरून न येणं, गिळताना त्रास होणं किंवा तोंडात सतत वेदना जाणवणं अशी लक्षणं अनेकदा सामान्य समजून दुर्लक्षित केली जातात. डॉक्टरांकडे जाण्याऐवजी अनेक जण घरगुती उपाय करतात किंवा वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधांच्या दुकानातून औषधं घेऊन उपचार करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे योग्य वेळी तपासणी होत नाही आणि आजार पुढच्या टप्प्यात पोहोचतो.

तंबाखूचं वाढतं सेवन

तंबाखूचे वाढतं सेवनही तोंडाच्या कॅन्सरमागचं महत्त्वाचं कारण आहे. गुटखा, पानमसाला, मावा, सिगारेट, बीडी अशा तंबाखूजन्य पदार्थांचा वापर अनेकजण लहान वयापासूनच सुरू करतात. जितक्या कमी वयात तंबाखूचं व्यसन लागतं, तितका पुढे कॅन्सरचा धोका वाढतो. तंबाखूमुळे होणारा कॅन्सर वेगाने वाढू शकतो त्यामुळे हे व्यसन वेळेत सोडणं गरजेचं आहे.

आपल्या देशात नियमित आरोग्य तपासणी आणि कॅन्सरसाठी आवश्यक स्क्रीनिंग करून घेण्याचं प्रमाण कमी आहे. स्क्रीनिंगमुळे आजार सुरुवातीच्या अवस्थेतच शोधता येतो आणि उपचार लवकर सुरू करता येतात. मात्र, अनेकांना सुरुवातीची लक्षणं कोणती, तपासणी कधी करावी याची पुरेशी माहिती नसते.

इंटरनेटवरील अपुरी किंवा चुकीची माहिती तसंच अपात्र व्यक्तींकडून उपचार घेण्याची सवयही धोकादायक ठरते. योग्य तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाण्याऐवजी चुकीच्या उपचारांमध्ये वेळ वाया जातो आणि तोपर्यंत कॅन्सर अधिक वाढलेला असतो.

तोंडात दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ न भरून येणारी जखम, सतत तोंड येणं किंवा इतर कोणतेही संशयास्पद बदल दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेत निदान, तंबाखूपासून दूर राहणं आणि नियमित तपासणी हीच सवय तुमचा कॅन्सरपासून बचाव करू शकते.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत नव्या शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा? जाणून आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया

छातीत वारंवार दुखत असेल तर अजिबात दुर्लक्ष करू नका; हा असू शकतो हार्ट अटॅकचा धोका

Manoj Jarange: २९ ऑगस्टला मनोज जरांगेंचे निर्णायक आंदोलन, फडणवीस सरकारपुढे ठेवल्या १० मागण्या?

Ladki Bahin Yojana : "आम्हाला लाभ नको!" जळगावातील हजारो महिलांचा 'लाडकी बहीण' योजनेला नकार, कारणही सांगितले

SCROLL FOR NEXT