Artcraft Health Saam TV
लाईफस्टाईल

Artcraft Health : शिवणकाम आणि विणकाम मानसिक आरोग्यासाठी वरदान; संशोधनातून उलगडलं रहस्य

Art and Craft Best For Health : शिवणकाम आणि विणकाम केल्याने आपल्या आरोग्यावर याचा चांगला परिणाम होतो. मानसिक स्वास्थ निट राहतं. तसेच आरोग्याशी संबंधित अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात.

साम टिव्ही ब्युरो

पूर्वीच्या काळात महिला प्रेग्नेंट असताना आणि अन्य फावल्या वेळात सतत शिवणकाम किंवा विणकाम तसेच विविध पेंटींग्स काढण्याचे काम करायच्या. अशा पद्धतीने अनेक जुणी माणसं आपला बराच वेळ यात घालवत होते. काही महिला मनोरंजन म्हणून देखील याकडे पाहत होत्या. आर्ट अँड क्राफ्टमध्ये आपला जास्त वेळ घालवणाऱ्या महिला तसेच अन्य व्यक्तींचे मानसिक स्वास्थ चांगले असते, असं एका संशोधनातून समोर आलं आहे.

शिवणकाम आणि विणकाम ही अशी कामे आहेत ज्यात व्यक्तीचं मनोरंजन होतं. तसेच मानसिक ताण कमी होतो. असे काम करणाऱ्या व्यक्ती आपल्या आयुष्यात कायम समाधानी आणि संतुष्ट असतात. ब्रिटनमध्ये ७,००० हून अधिक व्यक्तींवर या बाबत संशोधन करण्यात आलं आहे.

आर्ट आणि क्राफ्टने मन आनंदी कसं होतं?

तणाव दूर होतो

ज्या व्यक्ती विणकाम आणि शिवणकाम करतात किंवा आर्टशी संबंधित काही करतात तेव्हा त्यांना एक वेगळी ऊर्जा मिळते. हे काम करताना व्यक्ती आपला पूर्ण वेळ यामध्ये घालवतात. त्यामुळे हे काम करताना त्यावरच फोकस असतो. यावेळी मनात येणारे अन्य विचार दूर जातात. मन एकाग्र होतं आणि यातून मेडिटेशन घडतं. त्यामुळे ही कामे मानसिक शांतता देतात.

बुद्धीला चालना

आर्टमध्ये कायम बुद्धीला चालना मिळते. येथे तुम्ही तुम्हाला हवे तसे काम करू शकता. हे काम करताना आपल्याला विविध युनिक गोष्टी अपोआप सुचतात.

आत्मविश्वास वाढतो

मन एकाग्र असल्याने आणि क्रिएटीव्ह माइंडमुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. शिवणकाम आणि विणकाम परफेक्ट होऊ लागले की या व्यक्तींना आपण जीवणात सर्व काही मिळवू शकतो असं वाटू लागतं.

भावना व्यक्त करण्यासाठी मार्ग

आर्ट आणि क्राफ्ट आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे. अनेकदा आपल्या आयुष्यात अशा स्थिती असतात की त्यात आपण शब्द वापरू शकत नाही. अशावेळी तुम्ही भावना व्यक्त करण्यासाठी आर्ट आणि क्राफ्टचा वापर करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT