Heart Attack Risk google
लाईफस्टाईल

Heart attack morning risk: सकाळी ६ ते १० या वेळेतच का येतो हार्ट अटॅक? कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Why heart attacks happen in morning: सकाळी हार्ट अटॅकचा धोका जास्त का असतो यामागील कारणे जाणून घ्या. स्ट्रेस हार्मोन्स, रक्तदाब वाढ, डिहायड्रेशन आणि स्लीप डिसऑर्डर यांचा हृदयावर परिणाम होतो. योग्य काळजी घेतल्यास हा धोका कमी करता येऊ शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांमध्ये वाढ होताना दिसतेय. यामधील एक जीवघेणी समस्या म्हणजे हार्ट अटॅक. गेल्या काही काळात हार्ट अटॅकच्या प्रकरणांमध्ये वाढ झालीये. केवळ प्रौढ व्यक्ती नाही तर तरूणांमध्ये देखील हे प्रमाण वाढलं आहे. नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार, हार्ट अटॅकचे अनेक रुग्ण सकाळच्या वेळेतच दिसून येतात.

अनेक अभ्यासांनुसार, रात्रीच्या तुलनेत सकाळी हार्ट अटॅक येण्याचा धोका तब्बल तीनपट जास्त असतो. शरीरात सकाळी काय बदल होतात, यामुळे हा धोका वाढतो. ते जाणून घेणं गरजेचं आहे.

सकाळी स्ट्रेस हार्मोन्स वाढतात

रात्री झोपेत असताना आपल्या शरीराचं ब्लड प्रेशर तुलनेने कमी असतो. मात्र सकाळी उठताना शरीर हळूहळू अॅक्टिव्ह होऊ लागतं. या प्रक्रियेत कोर्टिसोल आणि अॅड्रेनालिनसारखे स्ट्रेस हार्मोन्स जास्त प्रमाणात स्रवले जातात. याला मॉर्निंग सर्ज असं म्हटलं जातं. या सर्जमुळे अचानक ब्लड प्रेशर आणि हार्ट रेट वाढतो. ज्यांच्या धमन्यांमध्ये आधीच ब्लॉकेज आहे, त्यांच्यासाठी हा वाढलेला दबाव धोकादायक ठरू शकतो. परिणामी हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

रक्त गुठळ्या होण्याचा धोका जास्त

सकाळच्या वेळेत रक्त थोडं घट्ट होतं असंही दिसून आलं आहे. जर धमन्यांमध्ये आधीच प्लाक साचलेला असेल तर अशा स्थितीत रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची शक्यता वाढते. हे क्लॉट्स रक्तप्रवाह अडवू शकतात आणि त्यामुळे हार्ट अटॅक होण्याचा धोका निर्माण होतो.

शरीरात पाण्याची कमतरता

आपल्या झोपेची वेळ ही साधारणपणे ७ ते ८ तासांची असते. यामध्ये आपण अजिबात पाणी पित नाही. त्यामुळे सकाळी शरीर थोडं डिहायड्रेटेड होतं. पाण्याची कमतरता असल्यामुळे रक्ताचं प्रमाण कमी होतं आणि ते अधिक घट्ट होतं. अशा वेळी हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते, ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो.

स्लीप डिसऑर्डरची समस्या

झोपेची गुणवत्ता आणि हृदयाचं आरोग्य यांचा थेट संबंध आहे. स्लीप अॅपनिया सारख्या आजारांमध्ये झोपेत श्वास वारंवार थांबतो. त्यामुळे शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी होते. यामुळे शरीरात सूज वाढते आणि सकाळी उठल्यावर हृदयावर जास्त दबाव येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एल निनोमुळे खरिपानंतर रब्बी पिकांवरही संकट; देशात अन्नधान्याचा तुटवडा भासणार?

Healthy Lifestyle : सिगारेट-दारूपेक्षाही खतरनाक आहे 'ही' १ गोष्ट, मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Wednesday horoscope: रखडलेलं काम होईल, वायफळ खर्च करू नका; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

SCROLL FOR NEXT