Ear pain causes, Parenting tips, Why ear pain increasing in young children, Child Care tips in Marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Child Care: लहान मुलांमध्ये कान दुखीचे प्रमाण का वाढते आहे? त्याची लक्षणे कोणती ?

मुले लहान असली की, त्यांच्या आरोग्याबाबतीत आपण खूपच काळजी घेतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुले लहान असली की, त्यांच्या आरोग्याबाबतीत आपण खूपच काळजी घेतो. त्यातील काही अवयव असे असतात त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते.(Child care tips in Marathi)

हे देखील पहा -

लहान मुलांमध्ये कान दुखीची समस्या ही सामान्य आहे. बहुतेक वेळा एकच कान दुखत असतो तर काही वेळा काहीच ऐकू येत नाही. याचे त्रास कधी कधी सौम्य असतात तर कधी अतिशय त्रासदायक. बऱ्याचदा ती सतत कान चोळत असतात परंतु, ते असे का करतात ते आपल्याला कळत नसते. त्यामुळे बाळाचा कान अधिक जास्त दुखी लागतो. बाळाच्या कानाचा मधला किंवा बाहेरील भाग दुखतो यांचे कारण वेगवेगळे असू शकते. कान का दुखतो व त्याचे नेमके कारण काय हे जाणून घेऊया.

कारणे -

१. मुले खेळताना सहसा त्यांची खेळणे तोंडात घालतात पण त्याचबरोबर ती नाकात व तोंडातही घालतात. त्यामुळे त्यांच्या कानाला वेदना होतात. त्यासाठी आपण मुलांकडे लक्ष द्यायला हवे.

२. सतत मुलांच्या कानात तेल (Oil) घातल्याने काही वेळा घाण ही अधिक खोलवर साचत जाते व त्यामुळे त्यांचा कान दुखू लागतो.

३. बऱ्याचदा मुलांची अंघोळ घालताना त्यांच्या कानात पाणी जाते व त्यामुळेही त्यांना कानदुखीचा त्रास उद्भवू शकतो.

४. मुलांना (Child) सर्दी आणि खोकला झाल्यानंतरही त्यांचा कान दुखू लागतो यासाठी वेळीच त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जा.

५. कधीकधी हवामानातील बदलामुळे ही मुलांचे कान दुखू लागतात.

लक्षणे -

- बाळाला नीट ऐकू न येणे

- झोपताना, खेळताना किंवा खाताना सतत कान चोळणे.

- सतत कान ओढत राहाणे व कानाला हात लावल्यानंतर रडणे.

- मुलं जास्त अस्वस्थ असतील तर समजावे त्यांचा कान दुखत असेल तसेत वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

Hero Glamour X125 विरुद्ध Honda Shine 125; फीचर्स, मायलेज, कोणती बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे?

SCROLL FOR NEXT