Winter Heart Attack Saam Tv
लाईफस्टाईल

Winter Heart Attack: थंडीच्या दिवसांत हार्ट अटॅकचा धोका का वाढतो? डॉक्टरांनी सांगितली ५ महत्त्वाची कारणं

Winter Heart Attack: हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका का वाढतो? रक्तवाहिन्या आकुंचन पावणे, वाढते प्रदूषण, व्यायामाचा अभाव आणि तणाव ही ५ महत्त्वाची कारणे डॉक्टरांकडून जाणून घ्या.

Shruti Vilas Kadam

Winter Heart Attack: हिवाळा सुरू झाला की वातावरणातील गारवा वाढू लागतो. सकाळी आणि रात्री तापमान थंड होतं. अशा वातावरणात सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या आरोग्याच्या समस्या वाढतात. मात्र, थंडीच्या दिवसांत केवळ सर्दी-खोकल्याचाच नाही, तर हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो. विशेषतः हायबीपी, डायबिटिज, कोलेस्ट्रॉल आणि आधीपासून हृदयविकाराचा त्रास असलेल्या व्यक्तींनी या काळात अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. हिवाळ्यात हार्ट अटॅक येण्याचा धोका नेमका का वाढतो? यामागची ५ महत्त्वाची कारणे जाणून घेऊया.

१. थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात

थंड वातावरणात शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत 'वेसोकंस्ट्रिक्शन' म्हणतात. त्यामुळे रक्तप्रवाहासाठी हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते. परिणामी रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयावर अतिरिक्त ताण येतो. विशेषतः उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलचा त्रास असलेल्या व्यक्तींनी काळजी घेणे आवश्यक आहे.

२. शारीरिक हालचाली कमी होतात

हिवाळ्यात थंडीमुळे अनेकजण मॉर्निंग वॉक आणि व्यायाम टाळतात. त्यामुळे शारीरिक हालचाली कमी होतात. नियमित व्यायाम न केल्यास हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे थंडीत घराबाहेर जाणे शक्य नसल्यास घरातच हलका व्यायाम आणि चालण्याचा सराव करा.

३. जंक फूड आणि तळलेले पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढते

थंडीच्या दिवसांत भूक वाढल्याने अनेकजण तळलेले पदार्थ, जंक फूड आणि तेलकट पदार्थ अधिक खातात. अशा पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स आणि मीठ जास्त असू शकते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब वाढण्याचा धोका असतो. परिणामी हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

४. हिवाळ्यात वाढते प्रदूषण

हिवाळ्यात अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता खालावते. PM2.5 आणि PM10 यांसारखे सूक्ष्म प्रदूषक घटक श्वासावाटे शरीरात प्रवेश करतात. यामुळे शरीरात सूज निर्माण होणे, रक्तवाहिन्यांच्या कार्यावर परिणाम होतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

५. मानसिक ताण आणि चिंता

दीर्घकाळ मानसिक तणावात राहिल्याने शरीरात स्ट्रेस हार्मोन्स वाढतात. त्यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढू शकतो. याचा हृदयावर ताण पडतो. त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी योगासने, ध्यान आणि पुरेशी झोप घेण्यावर भर द्या.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय कराल?

हिवाळ्यात उबदार कपडे घाला, नियमित हलका व्यायाम करा, संतुलित आहार घ्या आणि डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्या. छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, थंड घाम येणे किंवा अचानक चक्कर येणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरकडे जा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनाचा फॉरेन्सिक अहवाल प्राप्त

Ladli Behna Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Pune Land Scam: पुण्यात आणखी एक मोठा जमीन घोटाळा, बनावट सह्या अन् खोटी ओळखपत्रे वापरून शेती हडपली

Raj Thackeray : गोकुळवरून राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; म्हणाले, पराभव मान्य करायला हवा, पण...

Hair Care Tips : केस धुताना तुम्हीही या ७ चुका करता का? आताच बदला सवय अन्यथा..

SCROLL FOR NEXT