Fatty liver symptoms at night saam tv
लाईफस्टाईल

Liver pain symptoms: लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात नेमक्या कुठे होतात वेदना? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Liver disease early symptoms: लिव्हर खराब झाल्यावर शरीरात कोणत्या ठिकाणी वेदना होतात आणि कोणती लक्षणं दिसतात याची माहिती जाणून घ्या. योग्य वेळी ओळख करून घेतल्यास गंभीर आजारांपासून बचाव करणे शक्य होऊ शकते आणि आरोग्य सुधारता येते.

Surabhi Jayashree Jagdish

बिझी लाईफस्टाईलमुळे आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. अशातच हमखासपणे आपलं लिव्हरच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतंय. त्यामुळे अनेकदा लक्षणं दिसूनही बरेचजण त्याकडे दुर्लक्ष करतात. लिव्हरमध्ये समस्या आली की काही प्रमाणात वेदना होतात. लिव्हरमध्ये बिघाड झाल्यावर नेमकं कुठे आणि कसं दुखतं याबाबत डॉक्टरांनी माहिती दिलीये.

तज्ज्ञांच्या मते, लिव्हर हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव असून अन्न पचवणं, पित्त तयार करणं आणि रक्त शुद्ध करणं अशी अनेक कामं त्याद्वारे केली जातात. त्यामुळे लिव्हरमध्ये काही समस्या निर्माण झाली तर शरीरावर त्याचा परिणाम होतो. विशेष म्हणजे लिव्हर खराब झाल्यावर काही ठराविक भागात वेदना जाणवू लागतात.

गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ऑन्कोलॉजी आणि सर्जिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजी क्षेत्रातील वरिष्ठ तज्ज्ञ डॉ. विजयकुमार सी. बाडा यांनी सांगितलं की, लिव्हरशी संबंधित वेदना थेट जाणवत नाहीत. कारण लिव्हरमध्ये वेदना जाणवणाऱ्या नसांची संख्या खूप कमी असते. त्यामुळे लिव्हरमध्ये बिघाड झाला, तरी वेदना आसपासच्या अवयवांमुळे किंवा सूज यामुळे जाणवतात.

सिरोसिस, हेपेटायटिस, फॅटी लिव्हर किंवा जास्त प्रमाणात मद्यपान यांसारख्या कारणांमुळे लिव्हरमध्ये सूज येऊ शकते किंवा त्याचा आकार वाढू शकतो. यामुळे आसपासच्या अवयवांवर दाब पडतो आणि वेदना निर्माण होतात.

लिव्हर खराब झाल्यावर कुठे वेदना जाणवतात?

सर्वात सामान्यतः वेदना पोटाच्या वरच्या उजव्या बाजूला जाणवतात. याठिकाणी हलका त्रास, जडपणा किंवा दाब असल्यासारखी भावना निर्माण होऊ शकते. विशेषतः जास्त तेलकट किंवा फॅटयुक्त अन्न खाल्ल्यानंतर या वेदना अधिक जाणवतात. तसंच मद्यपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये हा त्रास अधिक वाढू शकतो.

काही वेळा या वेदना थेट त्या भागात न जाणवता शरीराच्या इतर भागातही जाणवू शकतात. जसं की, उजवा खांदा, पाठ किंवा पोटाच्या मधल्या वरच्या भागात दुखू शकतं. जर लिव्हरची समस्या गंभीर स्वरूपाची असेल तर पोटात जडपणा, सूज किंवा अस्वस्थता जाणवू शकते. काही प्रकरणांमध्ये पोटात पाणी साचण्याची समस्या उद्भवते. ज्यामुळे पोट फुगलेलं दिसून येतं.

ही लक्षणंही दुर्लक्षित करू नका

लिव्हरमध्ये बिघाड झाल्यास केवळ वेदनाच नाही तर शरीर काही इतर संकेतही देतं. यामध्ये सतत थकवा जाणवणं, त्वचा आणि डोळे पिवळे पडणं, मळमळ किंवा उलटीची भावना होणं, लघवीचा रंग गडद होणं, तसंच पाय किंवा पोटात सूज येणं यांचा समावेश होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

५ राज्यांच्या निवडणुका होताच मोदी सरकारने घेतले महत्वाचे निर्णय; कोण-कोणत्या राज्यांना होणार फायदा?

Maharashtra News Live Update: राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ ची भरती स्थगित

Cabinet Expansion: मोठी राजकीय घडामोड, मंत्रिमंडळ विस्तार होणार; 'सम्राट' सरकारमध्ये कोणत्या नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी?

रस्त्यावर सोन्याचा पाऊस? सोनं वेचण्यासाठी लोकांची झुंबड?

Crime News: नवरदेवाला 200 रुपयांची नोट दाखवत विचारला एक प्रश्न; उत्तर ऐकताच नवरीने मोडलं लग्न

SCROLL FOR NEXT