Under Eye Wrinkles Remedies Saam Tv
लाईफस्टाईल

Under Eye Wrinkles Remedies : वाढत्या वयात डोळ्यांखाली सुरकुत्या का येतात ? या घरगुती उपायांनी मिळवा सुटका

Eye Wrinkles Home Remedies : जसं जसे आपले वय वाढते तसं तसे आपल्या त्वचेत बदल दिसून येतात. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात.

कोमल दामुद्रे

Wrinkles Home Remedies : वाढत्या वयानुसार आपल्या शरीरात अनेक बदल होत जातात. त्याचा सर्वात आधी परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो. जसं जसे आपले वय वाढते तसं तसे आपल्या त्वचेत बदल दिसून येतात. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात.

डोळ्यांच्या (Eye) खाली सुरकुत्या येतात. ज्यामुळे डोळ्यांच्या खाली असणारी त्वचा ही अधिक नाजूक होते. त्यामुळे सुरकुत्या लगेच दिसून येतात. परंतु, असे शरीरात न्युट्रिशनची कमतरता, चिंता, तणाव व स्मोकिंग यामुळे त्वचेवर (Skin) बदल होताना दिसतात. जाणून घेऊया अशावेळी आपण डोळ्यांची व त्वचेची काळजी (Care) कशी घ्यायला हवी.

1. काकडी

शरीरात पाण्याची कमतरता जाणवू लागली की, डोळ्यांखाली सुरकुत्या येऊ लागतात. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. आपल्या आहारात फळे व भाज्याचा समावेश करा. काकडीचे सेवन करा. काकडी शरीराला हायड्रेट तर ठेवते त्याबरोबर त्वचेवर चमक देखील आणते. तसेच काकडी किंवा त्याचा रस डोळ्यांखाली लावा.

2. अंडी

डोळ्यांखाली काळी वर्तुळे किंवा सुरकुत्या दिसू लागल्यावर अंडे फायदेशीर ठरेल. त्यासाठी अंड्याचा पांढरा भाग घेऊन डोळ्यांखाली व चेहऱ्यावर लावा. कोरडे झाल्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेतील घट्टपणा टिकून राहिल व सुरकुत्या कमी होईल.

3. कोरफड

केस आणि त्वचेसोबत कोरफड सुरकुत्यांवर देखील फायदेशीर ठरते. सुरकुत्या घालवण्यासाठी हे खूप प्रभावी आहे. कोरफडचे जेल डोळ्यांखाली लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यामुळे त्वचेतील आर्द्रताही टिकून राहिल.

4. ऑलिव्ह ऑईल

डोळ्यांखाली सुरकुत्या दूर करण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा वापर करु शकतो. नियमितपणे रात्रीच्या वेळी डोळ्यांखाली ऑलिव्ह ऑईल लावून मसाज केल्यास सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kaju Benefits: रोज सकाळी ५ काजू खल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

Maharashtra Politics: महाराष्ट्रात सर्वात मोठी घडामोड; राज्यातील राजकारणात नवीन पक्षाची एंट्री, शरद पवारांसह, महायुतीचं वाढलं टेन्शन

Maharashtra Live News Update: संभाजीनगरमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! आमदार संदीप शिरसागर यांनी घेतलं कमळ हाती

Sanscreen For Winter: हिवाळ्यात तुमच्या त्वचेसाठी कोणतं सनस्क्रीन आहे बेस्ट, एकदा जाणून घ्या

Shocking : धक्कादायक! 45 प्रवाशांनी भरलेली खासगी बस अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी, नागपुरात खळबळ

SCROLL FOR NEXT