UPI Payment Fail  Saam Tv
लाईफस्टाईल

UPI Payment Fail : सतत UPI ट्रांजेक्शन फेल का होतात ? पैसे ट्रान्सफर करताना या 5 टिप्स लक्षात ठेवा

कोमल दामुद्रे

UPI Transaction : बदलत्या तंत्रज्ञानानुसार हल्ली डिजीटलायझेशन अधिक प्रमाणात होत आहे. त्यामुळे ऑनलाइन पेमेंटची प्रक्रीया देखील अधिक होत आहे. आपल्यापैकी अनेकांकडे Google Pay, Phone Pe, Paytm सारखे इतर ऑप्शन आहे.

या UPI ने अनेकांचे जीवन सोपे केले आहे. आपण मॉलमध्ये खरेदी (Shopping) करत असलो किंवा कोणालातरी ऑनलाइन पेमेंट करत असलो तरी UPI पटकन उपयोगात येते. पण अनेक वेळा काही चुकांमुळे ऑनलाइन (Online) व्यवहार पूर्ण होत नाही आणि UPI पेमेंट अडकून पडते. अशा परिस्थितीत यूपीआय पेमेंट अडकण्याची कोणती कारणे आहेत हे समजून घेणे फार महत्वाचे आहे. येथे आम्ही तुम्हाला त्या 5 कारणांबद्दल सांगत आहोत ज्या UPI पेमेंट करताना लक्षात ठेवल्या पाहिजेत.

1. UPI मध्ये दैनिक मर्यादा सेट करा:

बहुतांश बँका आणि पेमेंट गेटवेने एक दिवसाच्या UPI पेमेंटची मर्यादा निश्चित केली आहे. NPCI मार्गदर्शक तत्त्वांनुसार, UPI पेमेंटद्वारे एका दिवसात जास्तीत जास्त 1 लाख रुपये काढले किंवा ट्रान्सफर (Transfer) केले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही त्याची मर्यादा ओलांडली असेल, तर तुम्ही UPI पेमेंट करू शकणार नाही. पेमेंटसाठी तुम्हाला २४ तास पूर्ण होण्याची वाट पाहावी लागेल.

2. एकापेक्षा जास्त खात्यांशी UPI आयडी लिंक करा:

तुमच्या UPI आयडीमध्ये एकापेक्षा जास्त अकाउंट लिंक असल्यास तुम्हाला पेमेंट करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. एका बँकेचा सर्व्हर डाउन असेल तर तुम्ही दुसऱ्या बँकेच्या खात्यातून पेमेंट करू शकता. यामुळे पेमेंट अयशस्वी होण्याची समस्या संपते.

3. ज्याला पैसे पाठवणार असाल त्याचा तपशील चेक करा :

जेव्हा तुम्ही एखाद्याला पैसे पाठवता तेव्हा तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर करत आहात त्या व्यक्तीचे तपशील तपासा. जर तपशील चुकीचा असेल तर पेमेंट अयशस्वी होईल. या प्रकरणात, तपशील तपासल्यानंतर पैसे ट्रान्सफर करा.

4. योग्य UPI पिन एंटर करा:

आपल्याकडे अनेक पासवर्ड असतात. अशा परिस्थितीत प्रत्येक गोष्टीचे पासवर्ड लक्षात ठेवणे कठीण होते. अनेक वेळा लोक UPI पिन विसरतात आणि त्यामुळे पेमेंट फेल होते. चुकून UPI ​​पिन रीसेट करणे चांगले. अशा परिस्थितीत, जर तुमच्यासोबत असे घडले असेल आणि तुम्ही UPI पिन विसरला असाल, तर तुम्ही तो रीसेट करू शकता. तुम्ही UPI पिन विसरला असाल तर वर टॅप करून ते बदलू शकता.

5. इंटरनेट कनेक्शन तपासा:

नेटवर्क कनेक्शन हे UPI पेमेंट अडकण्याचे एक प्रमुख कारण आहे. जर इंटरनेट कनेक्शन योग्य नसेल तर तुम्ही पैसे देऊ नये. स्थिर इंटरनेट कनेक्शन उपलब्ध होईपर्यंत पेमेंट करू नका.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fast Benefits: उत्तम आरोग्यासठी उपवास आहे 'वरदान'

Diwali: दिवाळीचा घराचा प्रत्येक कोपरा सजवा अशा पद्धतीने;होईल आर्थिक भरभराट

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर, सलमान खान धमकीनंतर गृह विभागाला निर्देश

Armaan Malik Accident: 'मरता मरता वाचलो...' बिग बॉस फेम अभिनेत्याच्या कारचा झाला अपघात; Video केला शेअर

मासिक पाळीविषयीचे समज आणि गैरसमज, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं, वाचा सविस्तर!

SCROLL FOR NEXT