Reasons for heart attack in bathroom saam tv
लाईफस्टाईल

Heart attack in bathroom: बऱ्याच जणांना बाथरूममध्येच हार्ट अटॅक का येतो? यामागे काय कारणं आहे, जाणून घ्या

Reasons for heart attack in bathroom: बाथरूममध्ये हार्ट अटॅक येणं ही एक गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. यामागे अनेक शारीरिक आणि वातावरणीय कारणे आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करणे जीवघेणे ठरू शकते.

Surabhi Jayashree Jagdish

हृदयविकाराचा झटका हा कुठेही आणि कधीही येण्याची शक्यता असते. मात्र डॉक्टरांचं म्हणणं आहे की बाथरूमसारख्या एकांत आणि बंद ठिकाणी जर हा झटका आला, तर तो जीवघेणा ठरू शकतो. बरेचदा लोक अशा वेळी एकटे असतात. परिणामी हार्ट अटॅक आल्यानंतर तुम्हाला मदत मिळायला उशीर होतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, अटॅक हा बाथरूममध्येच का येतो?

बाथरूममध्येच हार्ट अटॅक का येतो?

डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, हृदयविकाराचा झटका हा हृदयाच्या विद्युतक्रियेतील बिघाडामुळे (electrical malfunction) होतो. ही गडबड काही विशिष्ट क्रियानंतर घडण्याची शक्यता असते. जसं की अंघोळ करताना, शौच करताना किंवा खूप थंड/गरम पाण्यात शरीर बुडवताना असं होऊ शकतं.

या गोष्टींमुळे शरीरावर अनपेक्षित ताण येतो आणि हृदयावर दाब निर्माण होतो. जे लोक आधीपासूनच हृदयविकाराच्या जोखमीसाठी संवेदनशील असतात, त्यांच्यासाठी हे अधिक घातक ठरू शकतं.

शौच करताना होणारा ताण

शौच करताना काही प्रमाणात प्रेशर द्यावं लागतं. ही कृती सामान्य असली तरी त्यामध्ये पोटावर दाब येतो आणि त्यामुळे हृदयावरही अप्रत्यक्ष ताण निर्माण होतो. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, याला ‘वासोवॅगल रेस्पॉन्स’ म्हणतात. याचाच अर्थ पोटावर दाब आल्याने वॅगस नर्व्हवर ताण येतो आणि हृदयाचा ठोका मंदावतो. ही अवस्था काही वेळा अचानक हृदयविकाराचा झटका आणू शकते.

थंड किंवा गरम पाण्याने अंघोळ करताना धोका

खूप गरम किंवा खूप थंड पाण्याने अंघोळ केल्यास शरीराचं तापमान झपाट्याने बदलतं. यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात किंवा फुगतात आणि रक्तदाबात झपाट्याने चढ-उतार होतो. याचा थेट परिणाम हृदयाच्या क्रियेवर होतो.

त्याचप्रमाणे खांद्यापर्यंत शरीर पाण्यात बुडवून बसल्याने हृदयावर अधिक दाब पडतो. त्यामुळे ज्या लोकांना आधीच उच्च रक्तदाब, हृदयविकार किंवा इतर हृदयसंबंधी समस्या आहेत, त्यांनी शरीर पूर्ण जास्त गरम किंवा थंड पाण्यात बुडेल अशा पद्धतीची अंघोळ करू नये.

औषधांचा चुकीचा डोससुद्धा ठरू शकतो धोकादायक

काही वेळा लोक आपली औषधं बाथरूमच्या कपाटात ठेवतात. त्याठिकाणी औषध घेतात आणि लगेच अंघोळ करतात. डॉक्टर सांगतात की, झोपेची गोळी किंवा काही रिलॅक्स करणारी औषधं घेतल्यानंतर लगेच अंघोळ केल्यास हृदयावर अनावश्यक ताण येतो. यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि cardiac arrest होण्याचा धोका निर्माण होतो.

जर कोणी बाथरूममध्ये असताना खालील लक्षणं अनुभवत असेल, तर ही हृदयविकाराची सुरुवात असू शकते:

  • छातीत तीव्र वेदना

  • श्वास घ्यायला त्रास होणे

  • अचानक चक्कर येणे

  • मळमळ किंवा उलटी

  • भान हरपणे

  • डोळ्यांसमोर अंधार येणे

काय काळजी घेतली पाहिजे?

  • बाथरूममध्ये गेलेल्या व्यक्तीला जास्त वेळ झाला, तर घरच्यांनी दरवाजावर आवाज देऊन खात्री करून घ्यावी

  • तुमच्या अंघोळीचं वेळापत्रक ठरवा. उदा. अंघोळीला किती वेळ लागतो ते घरच्यांना सांगा

  • खूप गरम पाण्यात अंघोळ टाळा, खासकरून औषध घेतल्यावर

  • बाथटबमध्ये बसत असाल, तर टायमर किंवा अलार्म लावा

  • झोपेची औषधं घेतल्यानंतर लगेच बाथरूममध्ये जाणं टाळा

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajinikanth-Coolie : रजनीकांतच्या चित्रपटासाठी सगळी कंपनीच बंद, कर्मचाऱ्यांना दिली मोफत तिकिटे

क्रिकेटविश्वात खळबळ! भारताच्या माजी क्रिकेटरला ईडीची नोटीस, आज चौकशी, नेमकं प्रकरण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी कोण? सासू, सून की जाऊबाई; लाडकी बहीण योजनेच्या लाभावरुन सासू-सुनांमध्ये महाभारत

ICICI नंतर आणखी एका बँकेचा ग्राहकांना मोठा धक्का, मिनिमम बॅलेंसचं लिमिट अडीचपट वाढवलं

Accident : भाविकांवर काळाचा घाला, पिकअपचा भयंकर अपघात, १० जणांचा मृत्यू, ७ मुलांचा समावेश

SCROLL FOR NEXT