heart blockage risk google
लाईफस्टाईल

Hidden Cholesterol Marker: कोलेस्ट्रॉल रिपोर्ट नॉर्मल असूनही का येतो हार्ट अटॅक? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Heart attack risk: कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य असली तरी हार्ट अटॅकचा धोका टळत नाही. तज्ज्ञांच्या मते, Lp(a) हा छुपा घटक रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण करू शकतो. हृदयाच्या आरोग्यासाठी या महत्त्वाच्या चाचणीबद्दल जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

बदलत्या जीवनशैलीमुळे, आपल्याला हृदयाशी संबंधित विविध समस्यांना सामोरं जावं लागतं. हृदयाचं आरोग्य म्हटलं की आपल्या मनात पहिल्यांदा कोलेस्ट्रॉलचा विचार येतो. बहुतेकांना असं वाटतं की, जर त्यांच्या कोलेस्ट्रॉलची पातळी नॉर्मल असेल तर त्यांचं हृदय पूर्णपणे सुरक्षित आहे.

परंतु गेल्या वर्षात अशी अनेक प्रकरणं समोर आलीयेत ज्यामध्ये कोलेस्ट्रॉलची सामान्य पातळी नॉर्मल असतानाही तरुण वयात हार्ट अटॅक आला. यामुळेच डॉक्टर आता केवळ एलडीएल, एचडीएल आणि ट्रायग्लिसराइड्सवरच नव्हे तर इतर चाचणी करण्याची शिफारस करतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कधीकधी शरीरात अशा समस्या असतात ज्या रिपोर्ट्समध्ये दिसत नाहीत. परंतु त्यांचा हृदयाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

Lp(a) म्हणजे काय?

डॉक्टरांच्या मते, लायपोप्रोटीन(ए), किंवा एलपी(ए), हा कोलेस्ट्रॉलच्या कणांचा एक विशिष्ट प्रकार आहे जो एलडीएल सारखा दिसतो. परंतु त्यामध्ये एक प्रोटीन जोडलेलं असतं. यामुळेच ते रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होण्याची प्रक्रिया वेगवान करू शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सामान्य लिपिड प्रोफाइल चाचणीमध्ये एलपी(ए) मोजलं जात नाही. त्यामुळे, एखाद्या व्यक्तीचा कोलेस्ट्रॉल रिपोर्ट सामान्य असला तरी त्यांच्या हृदयाला धोका असू शकतो.

भारतातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सध्या भारतात परिस्थिती चिंताजनक आहे. कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य असलेल्या अनेक लोकांना त्यांच्या तिशी आणि चाळीशीत हार्ट अटॅक येतोय. नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थच्या मते, अनुवांशिक घटकांमुळे वाढलेली Lp(a) पातळी हे एक कारण असू शकतं. हा घटक मोठ्या प्रमाणावर अनुवांशिकतेवर अवलंबून असतो.

तज्ज्ञांच्या मते, भारतात अकाली हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतंय. अनेक रिपोर्ट्सनुसार, देशातील एकूण मृत्यूंपैकी एक मोठा वाटा हार्ट अटॅकचा आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पाश्चात्य देशांच्या तुलनेत अनेक रुग्णांना १० ते १५ वर्षे आधीच हार्ट अटॅक येतोय. अनुवांशिक घटक, मधुमेह, उच्च रक्तदाब, चुकीची जीवनशैली आणि Lp(a) सारखे छुपे लिपिड मार्कर्स या धोक्याला वाढवू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधी ज्योतिष्याला OSDपद, आता चित्रपट निर्मात्याची थेट कॅबिनेट मंत्रिपदी नियुक्ती; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानं खळबळ

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई ते दिल्लीसह 9 मार्गांवर वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस; सरकारचा मोठा निर्णय

Water Intake: तुमच्या वजनानुसार किती पाणी प्यावे? जाणून घ्या पाण्याचे योग्य प्रमाण किती?

Maharashtra News Live Update: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; कार्ला फाट्याजवळ ५ किमीपर्यंत रांग

Maharastra : सर्वसामान्यांना झटका! कपड्यांची शिलाई महागणार, किती रुपये मोजावे लागणार? वाचा

SCROLL FOR NEXT