अगोदर मेरठची मुस्कान तर आता इंदूरची सोनम....असं म्हटलं जातंय या दोन्ही प्रकरणांमध्ये मुलींना आपल्या प्रियकरासाठी पतींची निर्घुण हत्या केली. मुस्कानचं प्रकरण आता कुठे शांत झालं होतं तर सोनमच्या आणि तिचा पती राज यांच्या प्रकरण समोर आलं. प्रकरण कोणतंही असो त्याचे पडसाद हे सोशल मीडियावर पडतातच. या प्रकरणानंतर इंस्टाग्रामवर असे अनेक रील व्हायरल होतायत ज्यात मुलं म्हणतायत आहेत की अभ्यासाचा आणि यशस्वी होण्याचा काय फायदा?
मेरठच्या मुस्कानचा प्रियकर साहिल शुक्ला आणि इंदूरच्या सोनमचा प्रियकर राज कुशवाह यांचे फोटो शेअर करत आहेत आणि असा प्रश्न उपस्थित करत आहेत की मुलींना छपरी प्रकारची मुलंच का आवडतात. गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावर टपोरी या शब्दाचा वापर खूप वाढला आहे. तज्ज्ञांकडून छपरी या शब्दाचा अर्थ आणि अशा मुलांसाठी नवऱ्याचा खून करणाऱ्या मुलींची मानसिकता काय असते ते जाणून घेऊया.
टपोरी ही प्रत्यक्षात सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झालेली एक अपभाषा आहे. ती अशा लोकांचे वर्णन करण्यासाठी वापरली जाते ज्यांचं व्यक्तिमत्व एक दिखावा असतो. ही एक प्रकारची तरुण शैली आणि वृत्ती आहे जी अतिशय विनोदी आणि नकारात्मक पद्धतीने वापरण्यात येते.
मेरठ आणि इंदूर या दोन्ही हत्याकांडांमध्ये, प्रेमी साहिल शुक्ला आणि राज कुशवाह हे दोन्ही तरूण समाजाच्या हिशोबाने आदर्श तरून नव्हते. साहिल ड्रग्ज व्यसनी असताना, त्याची खोली दारूच्या बाटल्यांनी भरलेली होती. त्यामुळे शेजारी त्याला 'चरसी' म्हणायचे. तर २१ वर्षांचा राज कुशवाहा हा सोनमच्या वडिलांच्या कारखान्यात एक अतिशय सामान्य कर्मचारी होता. तरीही, मुस्कान आणि सोनम यांनी त्यांच्या या प्रियकरांसाठी त्यांच्या पतींना मारण्याच्या निर्णय घेतला आहे.
मानसशास्त्रज्ञ डॉ. विधी एम पिलानिया यांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, हे खरे आहे की, ते आपल्याला ते छपरी वाटतात पण ज्या महिला त्यांना आवडतात त्यांच्यासाठी ते त्यांच्या भावनिक समाधानाचं साधन असतं. अशी मुलं त्यांना भावनिक समाधान देतात. ही मुलं त्यांच्याशी खूप आदराने वागतात. ते त्यांचा स्वाभिमान उंच ठेवतात आणि बऱ्याचदा ते स्वतःची आणि त्यांच्या वागण्याची एक बाजू दाखवतात जी खूप मानवी असते.
राज कुशवाहा याबद्दल डॉ. पिलनिया म्हणतात की, मी बातमी पाहत असताना राजची आई म्हणाली की, माझा मुलगा इतका दयाळू आहे की जर कोणाकडे चप्पल नसतील तर तो चप्पल देतो आणि अनवाणी चालतो. मुलींना आकर्षित करण्यासाठी हे मुलं ज्या प्रकारच्या वागणुकी दाखवतात, त्यामुळे काही मुली याकडे अधिक आकर्षित होतात. ही भावना नेहमीच मुलीला योग्य वाटते. अशा लोकांसोबत राहून, मुलींना असं वाटतं की, तो भावनिकदृष्ट्या माझा आदर करतो. मुळात मुलींच्या नजरेत तो गरीब नाही.
दिल्ली विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाचे शिक्षक चंद्र प्रकाश या घटनांना एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही प्रकरणांमध्ये गुन्हेगारी कृत्यं दिसून येतं. ही सामाजिक दबावाच्या पलीकडे असलेली बाब आहे. दोघांमध्येही मनोरुग्णाची प्रवृत्ती आहे. बऱ्याचदा जेव्हा दोन लोक प्रेमात असतात. त्यावेळी जर एका तेव्हा जर एकाने हत्येसारखं कृत्य केलं तर दुसरा मागे हटतो किंवा स्पष्टीकरण देतो. मात्र ज्यावेळी ही प्रवृत्ती दोघांमध्ये असते असे लोक एकमेकांशी विश्वासाचं नातं तयार करतात.
2010 मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात असं आढळून आलं की, महिला अशा पुरुषांकडे अधिक आकर्षित होतात जे त्यांच्यासाठी भावनिकदृष्ट्या पुरुष उपलब्ध असतात, त्यांची सरासरी सामाजिक स्थिती किंवा दिसणं हे जास्त महत्त्वाचं नसतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.