Indian Family Issues  google
लाईफस्टाईल

Modern Relationships : मुली सासू-सासऱ्यांसोबत राहायला नकार का देतात? जाणून घ्या महत्वाचं कारण

Indian Family Issues : पुर्वी कितीही मोठं कुटुंब असलं तरी एकत्र राहायचे. आता प्रत्येकाला कमी परिवार आणि वेगळ राहायला आवडत. म्हणजेच आता पिढी बदलली आहे. आजकालच्या मुली या मोठ्या कुटुंबात राहायला मागत नाहीत.

Saam Tv

आता पुर्वीसारखा पोशाख वापरणारी माणसं फार कमी दिसतात. पुर्वी लोक टांग्याने प्रवास करायचे आता कारने प्रवास करतात. पुर्वी कितीही मोठं कुटुंब असलं तरी एकत्र राहायचे. आता प्रत्येकाला कमी परिवार आणि वेगळ राहायला आवडत. म्हणजेच आता पिढी बदलली आहे. आजकालच्या मुली या मोठ्या कुटुंबात राहायला मागत नाहीत. त्यांना वेगळ राहायला आवडत. याच नेमकं कारण आपण जाणून घेणं फार महत्वाचं आहे.

मुली सासु-सासऱ्यांसोबत राहायला नकाक का देतात? याची कारणं पुढील मुद्याद्वारे स्पष्ठ केली आहेत.

स्वतंत्र विचार सरणी

सध्याचे युग हे प्रगतीचे युग आहे. अनेक नवनवीन वस्तूंचा, शैलींचा आता वापर केला जातो. त्यानुसार सगळेच वागत असतात. त्यात मुली स्वत: च्या भुमिका स्पष्ठ मांडत असतात. त्यामुळेच मुलीही हल्ली मनाप्रमाणे किंवा त्यांच्या इच्छेने स्थळ ठरवतात. आता फार घरांमध्ये लव्ह मॅरेजला सुद्धा परवानगी दिली जाते. मग लग्नानंतरही मुलींना स्वातंत्र्य हवं असतं. त्यांना त्यांची स्पेस हवी असते. त्यांना अनेक ठिकाणी कामं करायची असतात. त्यामुळे महिला किंवा मुली वेगळं राहणं पसंत करतात.

जनरेशन गॅप

जनरेशन गॅपमुळे मुलींना मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान होत असतं असं आपण म्हणू शकतो. त्यामध्ये सासु- सासरे आणि त्यांचे विचार खूप महत्वाचे असतात. जर ते जुन्या पद्धती फॉलो करणारे असले तर आत्ताच्या मुली सरळ लग्नाला नकार देतात. नव्या गोष्टी सासू सासरे आत्मसाद करत नाहीत. त्यामुळे मुलींच्या जीवनशैलीवर सुद्धा परिणाम होतो. त्यांना बंधनात अडकायला आवडत नाही. त्यांमुळे सासु-सासऱ्यांशी वाद होण्याची सुद्धा शक्यता असते.

करिअर

आज काल प्रत्येक व्यक्तीला काहीतरी मोठं करून दाखवायचं असतं. करिअर हा विषय त्यांच्यासाठी खूप गंभीर असतो. त्यांना नोकरी करायला आवडतं. बऱ्याचदा नवरा बायको दोघेही घर चालवतात. पण जेव्हा मुली सासू - सासऱ्यांसोबत राहतात तेव्हा त्यांची स्वप्न पुर्ण होत नाहीत. याचं कारण म्हणजे घरातल्या कामामुळे त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. परिणाम हा भांडणातून समोर येतो. त्यामुळे मुली वैतागतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT