Eye cancer symptoms saam tv
लाईफस्टाईल

Child eye cancer: बापरे! 5 वर्षांच्या 20 मुलांना डोळ्यांचा कॅन्सर; वाचा नेमकी लक्षणं काय आहेत?

Eye cancer symptoms: लहान मुलांच्या डोळ्यांमध्ये दिसणारी मांजरीसारखी चमक ही रेटिनोब्लास्टोमा कॅन्सरचं लक्षण असू शकते. वेळेत निदान केल्यास उपचार शक्य आहेत. पालकांनी अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Surabhi Jayashree Jagdish

बिहारमध्ये गेल्या महिन्याभरापासून लहान मुलांच्या डोळ्यांमध्ये समस्या असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी मुलांचे डोळे मांजराप्रमाणे चमकत असल्याचं लक्षात आला. ही समस्या दुसरी-तिसरी काही नसून आता कॅन्सर असल्याची धक्कादायक बाब समजतेय. अवघ्या एक महिन्यापासून पाच वर्षांपर्यंतच्या २० मुलांच्या डोळ्यांमध्ये कॅन्सरसारखा गंभीर आजार आढळल्याने डॉक्टर आणि पालक दोघांमध्येही चिंता वाढलीये.

वाराणसीतील बीएचयूच्या प्रादेशिक नेत्र संस्थेत या सर्व मुलांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणांमध्ये सुमारे ४० टक्के मुलांचे कॅन्सरग्रस्त डोळे काढावी लागली. तर उर्वरित ६० टक्के मुलांवर केमोथेरपीद्वारे उपचार सुरू आहेत.

विशेष म्हणजे या आजाराने ग्रस्त मुलांच्या डोळ्यांमध्ये अंधारात किंवा फ्लॅश लाईटमध्ये मांजरीसारखे चमकत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. बहुतेक मुलं पूर्वांचल भागातील विविध जिल्ह्यांतून आणि बिहारमधून उपचारासाठी आल्याची माहिती आहे. या सर्वांना रेटिनोब्लास्टोमा नावाचा जीवघेणा डोळ्यांचा कॅन्सर झाला आहे. यावेळी केवळ मार्च महिन्यातच तीन नवीन रुग्ण उपचारासाठी दाखल झालेत. तर उर्वरित प्रकरणं गेल्या सहा महिन्यांत समोर आल्याची माहिती आहे.

बीएचयूच्या नेत्र संस्थेचे विभागप्रमुख प्रा. डॉ. आर.पी. मौर्य यांनी सांगितलं की, या मुलांच्या डोळ्यांमध्ये कॅन्सरच्या गाठी वेगाने वाढताना दिसतायत. काही रुग्णांमध्ये हा कॅन्सर ऑप्टिक नर्वच्या माध्यमातून मेंदूपर्यंत पोहोचण्याच्या टप्प्यावर होता. त्यामुळे वेळेत उपचार करणं अत्यंत महत्त्वाचं होतं. काही मुलांवर केमोथेरपीसह मायक्रो सर्जरी करून ट्यूमर काढण्यात आला.

लहान मुलांवर शस्त्रक्रिया करताना अ‍ॅनेस्थेसिया देणं आणि डोळ्यातील नाजूक नसांचं संरक्षण करणं ही मोठी आव्हानं होती. ज्या मुलांचे डोळे काढावे लागले त्यांना कृत्रिम डोळे बसवण्यात आले आहेत. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, जर हा आजार सुरुवातीच्या टप्प्यात ओळखला गेला, तर सर्जरीच्या मदतीने तो पूर्णपणे बरा होऊ शकतो.

आठ महिन्यांच्या बाळाच्या डोळ्यात दिसायचा प्रकाश

बिहारमधील भभुआच्या आठ महिन्यांच्या बाळाच्या उजव्या डोळ्यात हलक्या प्रकाशात विचित्र चमक दिसत होती. फोटो काढताना फ्लॅशमुळे डोळ्यात लाल रंगाऐवजी पांढरा डाग दिसू लागला. बीएचयूमध्ये तपासणी केल्यानंतर कॅन्सर असल्याचं निदान झालं.

दोन्ही डोळ्यांमध्ये विचित्र चमक

वाराणसीच्या पिंडरा भागातील १४ महिन्यांच्या बाळाच्या दोन्ही डोळ्यांमध्ये एक विचित्र चमक दिसून आली. बाळाला खेळण्यांवर लक्ष केंद्रित करता येत नव्हतं. तपासणी केली असता त्याला ‘बायलेटरल रेटिनोब्लास्टोमा’ असल्याचं निदान झालं. म्हणजेच दोन्ही डोळ्यांमध्ये कॅन्सर होता.

डॉ. मौर्य यांच्या मते, हा कॅन्सर अत्यंत धोकादायक आहे. डोळ्याच्या रेटिनामधील पेशी अनियमितपणे वाढू लागतात आणि त्यातून गाठ तयार होते. वेळेत उपचार न मिळाल्यास हा ट्यूमर ऑप्टिक नर्वमार्गे मेंदूपर्यंत पोहोचू शकतो. जे लहान बाळांच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतं.

लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

  • कमी प्रकाशात किंवा कॅमेऱ्याच्या फ्लॅशमध्ये मुलांचे डोळे चमकणं

  • मुलं तिरकी नजर करून पाहत असतील किंवा दोन्ही डोळे एकाच दिशेला नसतील

  • कोणताही संसर्ग नसतानाही डोळा सतत लाल दिसणं.

  • डोळ्याला सूज येणं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अपात्र लाडक्या बहीणींचा लाभ पुन्हा सुरू होणार? E- KYC केंद्रांवर वाढली महिलांची गर्दी

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर बदलले; जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेटचे आजचे भाव?

Aishwarya Rai Video : Queen Is Back! ऐश्वर्या राय Cannes मध्ये चमकली; लेक आराध्याच्या लूकनं वेधलं लक्ष, सौंदर्य पाहून नेटकरी म्हणाले- "आई तशी लेक"

Accident News : बीडमध्ये मोठी दुर्घटना! विहिरीमध्ये ड्रिलिंग करताना दोन कामगारांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डीत दाखल

SCROLL FOR NEXT