Delicious Kaju Katli pieces showcasing the rich tradition and sweetness of Indian festive desserts 
लाईफस्टाईल

Kaju Katli History: काजू कतली कुठून आली? मिठाईचा शोध केव्हा आणि कसा लागला?

Kaju Katli History: मिठाईंची शान असलेल्या काजू कतलीचा शोध केव्हा आणि कसा लागला, असा प्रश्न लोकांना अनेकदा पडतो. चला, याची रंजक कहाणी जाणून घेऊया.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

  • काजू कतलीचा उगम मुघलकालीन शाही स्वयंपाकघराशी जोडला जातो

  • काजू, साखर आणि तूप वापरून तयार होणारी लोकप्रिय मिठाई

  • सणासुदीच्या काळात काजू कतलीला विशेष महत्त्व

तुम्ही कधी ना कधी काजू कतली खाल्ली असेलच. या मिठाईची चव इतकी अप्रतिम असते की ती पुन्हा पुन्हा खावीशी वाटते. पण तुम्हाला माहित आहे का काजू कतलीचा शोध कसा लागला? नाही, चला तर मग मिठाईचा इतिहास जाणून घेऊ. काजू कतली ही सर्वात आवडत्या मिठाईंपैकी एक मानली जाते.

दिवाळी, लग्नसमारंभ किंवा कोणत्याही मोठ्या उत्सवासाठी मिठाई आणायची ठरलं तर आपल्या डोळ्यापुढे येते ती म्हणजे काजू कतली. चांदीच्या नक्षीने सजवलेली ही मिठाई चव आणि प्रतिष्ठा या दोन्हींचे प्रतीक मानली जाते.

काजू कतलीचं तुरुंगाशी आहे खास नातं

प्रचलित मान्यतेनुसार, काजू कतलीचा इतिहास सुमारे ४०० वर्षे जुना आहे. या मिठाईचा अविष्कार दुकानात नव्हे, तर ग्वाल्हेर किल्ल्यातील तुरुंगात झाला होता.

जहांगीरच्या काळात बनवलेली एक विशेष मिठाई

मुघल सम्राट जहांगीरच्या काळात गुरु हरगोबिंद साहिब आणि अनेक राजांना ग्वाल्हेर किल्ल्यात कैद करण्यात आले होते. तेथील कैद्यांची स्थिती सुधारण्यात आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सक्षम करण्यात गुरूंनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या सेवाभावाने प्रभावित होऊन, जहांगीरने त्यांच्यासोबत असलेल्या इतर राजांच्या सुटकेचा आदेश दिला होता.

आदर आणि आनंदाचे प्रतीक

जेव्हा कैद्यांची सुटका व्हायची, तेव्हा त्यांच्या सुटकेचे प्रतीक म्हणून काजू वाटून एक गोड पदार्थ बनवला जायचा. हळूहळू, हा गोड पदार्थ लोकप्रिय झाला आणि 'काजू कतली' म्हणून ओळखला जाऊ लागला.

भारतात काजू कसे आले?

इतिहासकारांच्या मते, काजू मूळचे भारतीय नसून ते ब्राझीलमधील फळ आहे. पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी ब्राझीलमधून काजू गोव्यात आणले होते. सुरुवातीला जमिनीचे संरक्षण करण्यासाठी वापरले जाणारे काजू नंतर भारतीय शेफनी मिठाईमध्ये वापरण्यास सुरुवात केली.

हिऱ्याचा आकार

काजू कतलीला तिचा वैशिष्ट्यपूर्ण हिऱ्यासारखा आकार नंतर देण्यात आला. राजघराण्यातील स्वयंपाक्यांनी तिचे सौंदर्य वाढवण्यासाठी चांदीचे काम, केशरी रंग आणि आकर्षक कोरीवकाम यांचा वापर केला. यामुळेच ही मिठाई अप्रतिम दिसते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT