Baba Vanga Predictions saam tv
लाईफस्टाईल

Baba Vanga: बाबा वेंगांची भविष्यवाणी कोण डिकोड करतं? कुठे लिहून ठेवल्यात या गोष्टी?

Baba Vanga Predictions: बल्गेरियन संदेष्टा बाबा वेंगा यांची बहुतेक भाकीतं खरी ठरली आहेत. अमेरिकेचा 9/11 असो किंवा ISIS सारख्या दहशतवादी संघटनांचा उदय असो.

Surabhi Jayashree Jagdish

आतापर्यंत तुम्ही बाबा वेंगा यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. बल्गेरियातील या वृद्ध महिलेची माहिती असेल जिने 12 वर्षे सामान्य जीवन जगल्यानंतर एक विशेष गोष्ट मिळवली. ही गोष्ट म्हणजे भविष्यवाणी. भविष्य सांगण्यात ती निपुण झाली आणि तिला बाबा वेंगा हे नाव पडलं.

बल्गेरियन संदेष्टा बाबा वेंगा यांची बहुतेक भाकीतं खरी ठरली आहेत. अमेरिकेचा 9/11 असो किंवा ISIS सारख्या दहशतवादी संघटनांचा उदय असो. बाबा वेंगाची ही सर्व भाकीतं खरी ठरल्याचं समोर आलं आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, बाबा वेंगांची ही भविष्यवाणी कोण डीकोड करतं?

कशी डिकोड केली जाते भविष्यवाणी?

बाबा वेंगा हे प्रसिद्ध बल्गेरियन भविष्यकार होते. त्यांचा जन्म 1911 मध्ये झाला आणि 12 वर्षे सामान्य माणसाचं जीवन जगल्यानंतर त्या भविष्यवक्त्या बनल्या. 1996 मध्ये त्यांचं निधन झालं. पण त्यांनी दिलेल्या भविष्यवाण्या खऱ्या ठरताना लोकांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय.

जर आपण बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांचं डीकोडिंग म्हटलं तर ते वेगळे गट हे करतात. यासाठी कोणीही विशिष्ट व्यक्ती जबाबदार नाहीये. सहसा हे अंदाज अतिशय अस्पष्ट आणि प्रतिकात्मक असतात जे समजणं फार कठीण असतं. त्यामुळे त्यांना समजून घेण्याचं आणि डिकोड करण्याचे काम ज्योतिषी, इतिहासकार आणि तज्ज्ञ मंडळी करतात. याशिवाय वैज्ञानिक समज आणि दृष्टीकोन हा देखील यात मोठा घटक आहे, या घटकावरूनच अंदाजांची कसून तपासणी केली जाते आणि त्यानंतर त्याचा निष्कर्ष काढण्यात येतो.

सध्या का चर्चेत आहे बाबा वेंगा?

बाबा वांगाच्या 2025 च्या भविष्यवाणीनुसार, पृथ्वीपासून हजारो किलोमीटर दूर राहणारे एलियन ऑक्टोबर महिन्यात पृथ्वीवर परत येऊ शकतात. असं मानण्यात येतंय की, अनेक वर्षांत एकदा एलियन निश्चितपणे पृथ्वीवर परत येतात आणि त्यांचा प्रभाव दर्शवतात. त्यामुळे आता यावर्षी ऑक्टोबरमध्ये एलियन्स पृथ्वीवर येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.


सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Salman Khan : रक्तबंबाळ शरीर अन् डोळ्यात आग; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चं पोस्टर रिलीज, पाहा VIDEO

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT