Weight Loss Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी 'शुगर फ्री'चा ऑपशन निवडताय? कमी होण्याऐवजी झपाट्याने वाढेल, WHO सांगितले कारण

WHO Guidelines For Weight Loss : WHO ने शूगर फ्रीमुळे मधुमेह, हृदयविकार आणि वजनवाढीसारख्या आजारांमागचे कारण ठरत असल्याचा दावा केला आहे.

कोमल दामुद्रे

How To Lose Weight : आपल वजन नेहमी आटोक्यात रहावं असं प्रत्येकाला वाटत असतं. जरा वजन वाढलं की आपण लगेच ते कमी करण्यासाठी उपाय शोधू लागतो. वजन कमी करणाचा दावा करणाऱ्या अनेक प्रकाच्या गोळ्या आणि औषधं बाजारात उपलब्ध आहेत.

त्यात 'शुगर फ्री' सारख्या वजन (Weight) कमी करणाऱ्या साखरेचाही सामावेश होतो. तुम्ही देखील या गोष्टीवर विश्वास ठेवून जर त्याचा वापर करत असाल तर, सावध व्हा! कारण जागतिक आरोग्य संघटना (WHO)ने शुगर फ्रीमुळे मधुमेह (Weight), हृदयविकार आणि वजनवाढीसारख्या आजारांमागचे कारण ठरत असल्याचा दावा केला आहे.

1. 'शुगर फ्री'चा वाढता धोका

नुकत्याच पार पडलेल्या संशोधनानुसार, जागतिक आरोग्य संघटना (WHO)ने साखर नसलेल्या गोडव्यावर नवी मार्गदर्शक तत्वे लागू केली आहेत. या अंतर्गत अधिक कालावधीसाठी कृत्रिम स्वीटनरचा वापर धोकादायक ठरु शकतो असा दावा करण्यात आला आहे. संशोधनानुसार कृत्रिम स्वीटनर किंवा साखर (Sugar) नसलेला गोडवा (Non Sugar Sweeteners)वजन घटवण्यासाठी आणि जीवनशैलीतील आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हानिकारक ठरु शकतो. त्याचबरोबर याचा परिणाम हृदयरोग आणि वजन वाढीवर होतो.

2. काय म्हणतयं WHO

WHO च्या म्हणण्यानुसार, कृत्रिम स्वीटनर हे कोणत्याही प्रकारचे पोषक तत्त्व नाही. अधिक कालावधीसाठी याचा वापर केल्यास शरीरावर विपरीत परिणाम होतो. वजन अशक्यरीत्या वाढू शकते. याउलट, ऊस आणि फळांतून मिळणारी साखर नैसर्गिक आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात तीचे सेवन केल्यास त्याचा शरीरावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. लहानपणापासूनच गोड पदार्थांवर नियंत्रण ठेवण्याची सवय केल्यास हे शक्य होईल.

3. मधुमेही रुग्णांनी घ्यावी विशेष काळजी

WHO द्वारे लागू केलेली मार्गदर्शक तत्त्वे मधुमेही रुग्णांसाठी नाहीत. मधुमेही रुग्णांना त्यांच्या पथ्यानुसार दैनंदिन कृत्रिम स्वीटनरच्या डोसबद्दल माहीती दिलेली असते. हे नो कॅलरी किंवा शून्य कॅलरीसारख्या बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायांबाबत असून, त्यांच्या वापराबाबत आणि मर्यादेबाबत अधिक दिलेली माहिती नसते त्याकरीता आहेत.

4. संशोधनात समोर आलेले मुद्दे

संशोधनानुसार, कृत्रिम गोडव्याचा तीन महिन्यांपर्यंत वापर केल्यास थोड वजन कमी होऊन कॅलरी घटल्याचे जरी जाणवत असले तरी शरीरात ग्लुकोजचे प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे हृदयविकार आणि मधुमेहावरही काही परिणाम होत नाही. संशोधनात एका गटाला कृत्रिम स्वीटनर देण्यात आले आणि दुसऱ्या गटाला पाणी देण्यात आले. दोन्ही गटांच्या चाचण्यात काही फरक पडला नाही. परंतु ज्या लोकांनी दहा वर्षांपर्यंत कृत्रिम स्वीटनरचे सेवन केले त्यांच्या वजनात वाढ दिसली.

5. हृदयविकाराचा धोका

एका संशोधनात, 13 वर्षांच्या फॉलोअपनुसार अनेक लोकांमध्ये मधुमेह आणि हृदयरोगासारख्या आजारांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. जे लोक सॅकरिनयुक्त पदार्थ खात होते त्यांना रक्ताच्या कँसरचा धोका वाढलेला दिसून आला. गरोदर महिलांमध्ये वेळे आधी बाळंत होणे, नवजात बालकांमध्ये अस्थमा आणि ऍलर्जची समस्या जाणवणे या समस्या दिसून आल्या. तरी गर्भावस्थेत होणारा मधुमेह आणि कृत्रिम स्वीटनरचा वापर यामध्ये कोणताही संबंध आढळलेला नाही. लहान मुलांवर मात्र या कृत्रिम स्वीटनरच्या वापराचा काही परिणाम झालेला दिसून येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Festival Makeup Look: सणासुदीला खास लूक हवा असेल तर यावेळी 'हा' मेकअप लूक नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जालना रोडवर धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

Manoj Jarange: मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर येणार की नाही? समोर आली मोठी अपडेट

Dussehra 2025: दसऱ्याला आवर्जून करा ही ३ कामे, पैशांची तंगी होईल कायमची दूर

Scheduled Caste : अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण केलं नाही, तर...; फडणवीस सरकारला कुणी दिला मोठा इशारा?

SCROLL FOR NEXT