White Hair Solution Saam Tv
लाईफस्टाईल

White Hair Solution : एकदा करुन तर पाहा! पांढरे केस होतील काळेभोर-दाट, असा तयार करा शिकाकाईचा शाम्पू...

कोमल दामुद्रे

Home Remedies For White Hair : हल्ली प्रत्येक वयोगटातील लोक केसाच्या अनेक समस्यांपासून त्रस्त आहेत. केस गळणे, केसांत कोंडा होणे, केस विरळ होणे यांसारख्या समस्यांना ते सतत सामोरे जात असतात.

चेहऱ्याचे मुख्य आकर्षण असतात ते केस. लांबसडक व काळेभोर केस कोणाला नकोत. हल्ली केसांना जपण्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करतो. ज्यामुळे केस वाढतील इतकीच अपेक्षा असते. परंतु, कितीही महागडे उत्पादने वापरली तरी केस हे पांढरेच होतात जर तुम्हालाही केस काळेभोर व दाट करायचे असतील तर आयुर्वेदातील शिकाकाई वापरुन पाहा.

1. कसा कराल वापर?

शिकाकाईचा वापर हा केसांसाठी (Hair) फायदेशीर (Benefits) मानला जातो. ज्यामुळे तुमचे केस अधिक लांब, मजबूत व काळे होण्यास मदत होते. त्यासाठी शिकाकाईचा शाम्पू बनवून तुम्ही त्याचा वापर केसांसाठी करु शकतो.

2. कसा तयार कराल शाम्पू

  • शिकाकाई- 250 ग्रॅम

  • रीठा - 100 ग्रॅम

  • मेथीचे दाने दाना - 100 ग्रॅम

  • सुकवलेला आवळा (Amala)– ५० ग्रॅम

  • कडुलिंबाची सुकलेली पाने - मूठभर

  • कडीपत्त्याची पाने - मूठभर

3. याप्रकारे बनवा

शिकाकाईचा शाम्पू बनवण्यासाठी वरील सर्व साहित्य कोरडे वाटून घ्या. त्यानंतर वरुन मीठ घालून चाळणीने गाळून घ्या. बंद डब्यामध्ये भरुन ठेवा. आठवड्यातून दोन वेळा केस धुताना याचा वापर करा. नियमितपणे वापर केल्यास केस घनदाट ते काळे देखील होतील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Personality Development: अधिक आत्मविश्वास आणि आकर्षक होण्यासाठी 7 मार्ग

Maharashtra News Live Updates: सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्याला पनवेल कोर्टात केलं हजर

Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

SCROLL FOR NEXT